शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

मुक्त विद्यापीठाच्या प्रवेश मुदतवाढीत कृषी शिक्षणक्रमास वगळले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 5:17 PM

YCMOU News सर्व कृषी शिक्षणक्रमास वगळण्यात आले आहे

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी विविध शिक्षणक्रमांचे आॅनलाइन प्रवेशासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतू कोरोनामुळे अनेक विद्यार्थी मुदतीमध्ये प्रवेश घेऊ शकले नाही. त्यामुळे आॅनलाइन प्रवेशासाठी १५ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामध्ये सर्व कृषी शिक्षणक्रमास वगळण्यात आले आहे; बी.एड् प्रथम वर्ष, एमबीए या शिक्षणक्रमासही मुदतवाढ देण्यात आलेली नाही.कोरोना विषाणू संसर्गामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया विस्कळीत झाली आहे. शाळा, महाविद्यालय बंद असले, तरी आॅनलाइन शैक्षणिक सत्र सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे यंदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा मुक्त विद्यापीठाकडे कल दिसून येत आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांसाठी विविध शिक्षणक्रमाचे आॅनलाईन प्रवेश २१ जुलै २०२० पासून सुरु झाले होते. विनाविलंब प्रवेश घेण्यासाठी ३० सप्टेंबर २०२० पर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती. यापूर्वीही मुदतीमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊ शकले नाही, विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता मुदत वाढत देण्यात आली होती. ३० सप्टेंबरची मुदत आता संपुष्टात आलेली आहे. राज्यभर कार्यरत असलेली अभ्यासकेंद्र आणि विद्यार्थ्यांची मागणी तसेच ‘कोरोना’ विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी आॅनलाईन प्रवेशअर्ज भरण्याची मुदत पुन्हा १५ आॅक्टोबर २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे. परंतू या मुदतवाढीमध्ये बी.एड. प्रथम वर्ष, एम.बी.ए. व सर्व कृषी शिक्षणक्रमास वगळण्यात आले आहे.  यामुळे सर्व कृषी शिक्षणक्रम, प्रथम वर्ष बी.एड्, प्रथम वर्ष बी.एड. (विशेष शिक्षण) आणि प्रथम वर्ष एम.बी.ए. या शिक्षणक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या मुदतवाढीचा फायदा होणार नाही.

टॅग्स :Educationशिक्षणbuldhanaबुलडाणाuniversityविद्यापीठ