शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

जिल्ह्यातील १६४ आरोग्य संस्थेची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:49 IST

बुलडाणा : रिमझिम पावसामुळे डास अळींचे प्रमाण वाढून आजाराचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढते. त्यातच शहरी भागातील आरोग्य सेवा देणार्‍या संस्थे परिसरात डास अळींचे उत्पत्ती स्थान दिसून येतात. त्यामुळे उपचारासाठी भरती असलेल्या रुग्णांचे जीवन धोक्यात येते. या पृष्ठभूमीवर जिल्हा हिवताप कार्यालयाकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. यावेळी तपासणी केलेल्या १६४ आरोग्य संस्थेपैकी चार आरोग्य संस्था परिसरात डास अळी असलेले दूषित कंटेनर आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देचार संस्थेचे कंटेनर आढळले दूषितजिल्हा हिवताप कार्यालयाची विशेष मोहीम

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : रिमझिम पावसामुळे डास अळींचे प्रमाण वाढून आजाराचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढते. त्यातच शहरी भागातील आरोग्य सेवा देणार्‍या संस्थे परिसरात डास अळींचे उत्पत्ती स्थान दिसून येतात. त्यामुळे उपचारासाठी भरती असलेल्या रुग्णांचे जीवन धोक्यात येते. या पृष्ठभूमीवर जिल्हा हिवताप कार्यालयाकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. यावेळी तपासणी केलेल्या १६४ आरोग्य संस्थेपैकी चार आरोग्य संस्था परिसरात डास अळी असलेले दूषित कंटेनर आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस होऊन ठिकठिकाणी डबके साचून आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यात मागील काही दिवसांपासून व्हायरलचा प्रकोप वाढला असून, मलेरिया, डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली आहे. दिवसा ऊन-पाऊस आणि सकाळ- सायंकाळी दमट  वातावरणामुळे व्हायरलचा प्रकोप वाढला आहे. खासगी हॉस्पिटलसह जिल्हा सामान्य रुग्णालयात  खोकला, ताप आणि श्‍वसनाचे आजार असलेल्या रुग्णांची संख्याही वाढली. त्यामुळे जानेवारी ते जुलै २0१७ मध्ये जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाकडून २ लाख ४६ हजार ९८३ रक्त नमुने गोळा करून तपासणी करण्यात आली.  त्यात मलेरियाचे १८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, त्यातील जुलै महिन्यात आठ रुग्ण आढळले. या पृष्ठभूमीवर शासनाच्या आरोग्य विभागाकडून जिल्हा हिवताप कार्यालयास १ ते ३ ऑगस्टदरम्यान शहरी भागातील आरोग्य संस्थेची तपासणी करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील शहरी भागात असलेल्या आरोग्य संस्थेची तपासणी जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पाच आरोग्य सहायक व २२ कर्मचार्‍यांनी पूर्ण केली. तसेच संबंधित अहवाल ५ ऑगस्ट रोजी शासनाकडे सादर केला. त्यात १६४ आरोग्य संस्थेपैकी चार आरोग्य संस्था परिसरात डास अळींचे दूषित कंटेनर आढळून आले. 

या चार संस्थांमध्ये आढळले दूषित कंटेनर!जिल्ह्यात संग्रामपूर व मोताळा तालुका वगळून इतर ११ तालुक्यांतील शहरी भागातील आरोग्य संस्था म्हणजे शासकीय तसेच खासगी हॉस्पिटल परिसरात डास अळींचे दूषित कंटेनर शोध मोहीम १ ते ३ ऑगस्टदरम्यान राबविण्यात आली. त्यात चार आरोग्य संस्था परिसरात दूषित कंटेनर आढळून आले. दूषित कंटेनर आढळून आलेल्या आरोग्य संस्थेमध्ये ग्रामीण रुग्णालय चिखली येथे तपासलेल्या आठ कंटेनरपैकी एक दूषित आढळले. मल्टी हॉस्पिटल मेहकर येथे एका कंटेनरची तपासणी केली असता दूषित आढळले. गजानन हॉस्पिटल मेहकर येथे एका कंटेनरची तपासणी केली असता, दूषित आढळले. तसेच डॉ. कलावटे हॉस्पिटल शेगाव येथे तीन कंटेनरची तपासणी केली असता, एक कंटेनर दूषित आढळले.

मागील वर्षापेक्षा यावर्षी मलेरियाचे रुग्ण कमीजिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाकडून मागील वर्षी सन २0१६ मध्ये ४ लाख ७९ हजार २६७ रक्त नमुने तपासण्यात आले होते. त्यात ६४ मलेरियाचे रुग्ण आढळले होते. तर यावर्षी मागील सात महिन्यात जानेवारी ते जुलै २0१७ मध्ये २ लाख ४६ हजार ९८३ रक्त नमुने गोळा करून तपासणी करण्यात आली.  त्यात मलेरियाचे १८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, त्यातील जुलै महिन्यात आठ रुग्ण आढळल्यामुळे मलेरियाचे प्रमाण कमी आहे.

शासनाच्या आदेशान्वये जिल्ह्यातील शहरी भागात डास अळी शोध मोहीम राबविण्यात आली. त्यात ज्या आरोग्य संस्था परिसरात दूषित कंटेनर आढळून आले, त्या संस्थेला कंटेनर तसेच परिसर स्वच्छ ठेवण्याचा आदेश देऊन आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या.-एस.बी. चव्हाण,  जिल्हा हिवताप अधिकारी, बुलडाणा.