शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

मुक्त शिक्षणाचा असाही गैरफायदा: परवागनी नसतानाही एकाच विद्यापीठातून दोन पदव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 15:17 IST

परवागनी नसतानाही विद्यार्थी एकाच विद्यापीठाच्या अथवा दोन विद्यापीठाच्या दोन पदव्या घेवून मुक्त शिक्षणाचा असाही गैरफायदा घेत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्दे नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्याची कार्यपद्धती ठरविलेली आहे.आॅनलाइन प्रवेशापासून एकच विद्यार्थी एकाच वेळेस दोन पदव्या किंवा पदव्यूत्तर पदव्या घेत असल्याचे प्रकार वाढत आहेत.एकाच वेळी एक किंवा दोन विद्यापीठातून दोन पदव्या किंवा पदव्युत्तर पदवी घेणारे अनेक विद्यार्थी आढळून येतात.

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा: विद्यार्थ्यांना एकाच विद्यापीठातून किंवा दोन विद्यापीठाच्या एकाचवेळी दोन पदव्या अथवा पदव्यूत्तर पदव्या घेता येत नसल्याचा नियम यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये आहे. मात्र परवागनी नसतानाही विद्यार्थी एकाच विद्यापीठाच्या अथवा दोन विद्यापीठाच्या दोन पदव्या घेवून मुक्त शिक्षणाचा असाही गैरफायदा घेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे इतर ठिकाणी प्रवेश नसल्याचे विद्यार्थ्यांकडून घेतले जाणारे हमीपत्र नावालाच राहत आहे.  नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्याची कार्यपद्धती ठरविलेली आहे. अत्यल्प शिक्षण शुल्कात दर्जेदार शिक्षण देण्यावर सुरुवातीपासूनच भर दिला आहे. विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या माध्यमातून हव्या त्या ठिकाणाहून प्रवेश आणि परीक्षा पद्धतीमुळे वेळेची आणि पैशाची बचत होऊ शकते. मात्र आॅनलाइन प्रवेशापासून एकच विद्यार्थी एकाच वेळेस दोन पदव्या किंवा पदव्यूत्तर पदव्या घेत असल्याचे प्रकार वाढत आहेत. युजीसीच्या नियमान्वये एकाच विद्यार्थ्यास एकाच विद्यापीठाच्या अथवा दोन विद्यापीठाच्या स्वतंत्र दोन पदव्या अथवा पदव्युत्तर पदव्या घेता येत नाही. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेसाठी आॅनलाइन अर्ज करताना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर स्पष्ट नमुद करण्यात आलेला आहे. मात्र तरीसुद्धा या नियमाची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. आॅनलाइन प्रवेश घेताना विद्यार्थ्यांकडून ‘‘प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या पदवी व्यतिरिक्त या अथवा कोणत्याही विद्यापीठात पदवी अथवा पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेतलेला नाही; असा प्रवेश घेतलेला असल्यास माझा प्रवेश रद्द होईल आणि मी एका विद्यापीठाची पदवी अथवा पदव्युत्तर पदवी परत करील.’’  असे हमीपत्र घेतल्या जाते. मात्र तरीसुद्धा एकाच वेळी एक किंवा दोन विद्यापीठातून दोन पदव्या किंवा पदव्युत्तर पदवी घेणारे अनेक विद्यार्थी आढळून येतात. याची कुठेच तपासणी किंवा पडताळणी होत नसल्याने विद्यार्थी सुद्धा मुक्त शिक्षणाचा गैरफायदा घेण्यास मागे पुढे पाहत नसल्याचे दिसून येते. 

विद्यार्थ्यांना मतदार यादीत नावाची अटशैक्षणिक सत्र २०१८-१९ मध्ये प्रवेश घेणाºया सर्व विद्यार्थ्यांना मतदार नाव नोंदणी यादीमध्ये नाव समाविष्ट करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांने हमीपत्र भरणे आवश्यक केले आहे. त्यामध्ये विद्यार्थी १८ वर्षाचा नसेल तर १८ वर्षे पूर्ण झाल्याबरोबर नाव मतदार यादीत नोंदवून घेणार असल्याचे प्रतीज्ञापत्र विद्यार्थ्यांकडून घेणे आवश्यक आहे. मात्र हा नियम विद्यापीठाकडून केवळ कागदावरच राहत आहे. 

एकाच विद्यार्थ्यास एकाच विद्यापीठाच्या किंवा दोन विद्यापीठाच्या स्वतंत्र दोन पदव्या घेता येत नाहीत. तसे पत्र मुक्त विद्यापीठाकडून  केंद्राच्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. परंतू काही विद्यार्थी हा नियम मोडून प्रवेश घेतात. - प्रा. संजय सोनुने, केंद्र संयोजक,अभ्यास केंद्र यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, जिजामाता महाविद्यालय, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाuniversityविद्यापीठ