शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानानंतरही शेतकऱ्यांची कपाशी पिकालाच पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 11:54 IST

Farmers prefer cotton crop : शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशीलाच पसंती दिली असून, खामगाव तालुक्यात २७ हजार ५५६ हेक्टरवर लागवड केली आहे.   

- विवेक चांदूरकर  लोकमत न्यूज नेटवर्क   खामगाव : गतवर्षी गुलाबी बोंड अळी व संततधार पावसाने झालेल्या बोंडसडमुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे कृषी विभागानेही यावर्षी कपाशीची पेरणी होईल, असा अंदाज बांधला होता. मात्र, शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशीलाच पसंती दिली असून, खामगाव तालुक्यात २७ हजार ५५६ हेक्टरवर लागवड केली आहे.    गतवर्षी बुलडाणा जिल्ह्यात कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यामुळे कपाशीचे २० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते. त्यानंतर परतीचा पाऊस जोरदार व संततधार झाला. त्यामुळे कपाशीची बोंडे सडली. आधीच बोंडअळीने नुकसान झाल्यानंतर बोंडसडमुळे कपाशीचे ४० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले. त्यामुळे कपाशी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले होते. त्या तुलनेत सोयाबीन व अन्य पिकांचे उत्पादन चांगले झाले होते. त्यामुळे यावर्षी कपाशीची पेरणी कमी प्रमाणात होईल, असे नियोजन कृषी विभागाने केले होते. तालुक्यात  बागायती  कापूस ७ हजार तर जिरायती कापूस १८ हजार अशी कपाशीची २५ हजार हेक्टरवर पेरणी होईल, असे नियोजन करण्यात आले होते. मात्र, आतापर्यंत केवळ ६० टक्केच पेरणी झाली असून, तालुक्यात २७ हजार ५५६ हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कपाशीचे एका एकरात पेरणी करण्याकरिता १ हजार रुपयांचे बियाणे लागते तर सोयाबीनचे ३५०० रुपयांचे बियाणे लागते. त्यातच गतवर्षी तालुक्यात सोयाबीनचे बियाणे मोठ्या प्रमाणात बोगस निघाले होते. त्यामुळेही शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशीच्या लागवडीला पसंती दिली.  

तालुक्यात             ६० टक्के पेरणी n तालुक्यात एकूण भौगोलिक क्षेत्र ११८५३४ हेक्टर असून पेरणीयोग्य वहितीखालील क्षेत्र ८४३७१ हेक्टर आहे. n यापैकी ४९९५४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक कपाशीची पेरणी झाली आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेतीFarmerशेतकरी