शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
2
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
3
मायक्रोसॉफ्टने नोकियानंतर या कंपनीवर तगडा पैसा लावला; Ai च्या इतिहासातील सर्वात मोठी डील, फळणार का?
4
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठ्ठा राडा !! मोहम्मद रिझवान पाक क्रिकेट बोर्डाला नडला... काय घडलं?
5
किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; सेन्सेक्स ८५,००० अंकांच्या आणि निफ्टी २६,००० अंकांच्या जवळ
6
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
7
PPF ला साधं समजू नका! पती-पत्नी मिळून बनवू शकता ₹१.३३ कोटींचा फंड, तोही टॅक्स फ्री
8
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
9
'तो' प्रवास ठरला शेवटचा! कुटुंबीयांसमोरच वडील आणि मुलीचा होरपळून मृत्यू; १० जण जखमी
10
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
11
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
12
बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?
13
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
14
शोधत होते दारू, सापडले एक कोटी रुपये; तपासणी नाक्यावर खाजगी बसमध्ये आढळली अवैध रक्कम
15
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
16
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
17
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
18
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
19
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
20
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट

१६ प्रकल्पांवर लावणार बाष्पीभवन मापक यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 02:27 IST

हवामानातील बदल, वाढते उष्णतामान पाहता एक हजार हेक्टरपेक्षा अधिक सिंचन क्षमता असणार्‍या बुलडाणा जिल्हय़ातील मोठय़ा, मध्यम आणि लघू अध्या एकूण १६ प्रकल्पांवर नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (मेरी) मार्गदर्शक तत्त्वानुसार बाष्पीभवन मापक यंत्र बसविण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देपुढील महिन्यात प्रत्यक्ष अंमलबजावणी 

नीलेश जोशी। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: हवामानातील बदल, वाढते उष्णतामान पाहता एक हजार हेक्टरपेक्षा अधिक सिंचन क्षमता असणार्‍या बुलडाणा जिल्हय़ातील मोठय़ा, मध्यम आणि लघू अध्या एकूण १६ प्रकल्पांवर नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (मेरी) मार्गदर्शक तत्त्वानुसार बाष्पीभवन मापक यंत्र बसविण्यात येणार आहेत.अलीकडील काळात जागतिक हवामान बदलामुळे वाढलेलेले उष्णतामान पाहता प्रकल्पातील जलसाठय़ाच्या बाष्पीभवनाचे प्रमाण वाढलेले आहेत. साधारणत: वार्षिक सरासरी ३0 टक्के पाण्याचे बाष्पीभवन होत असते. परिणामी शहरी तथा नागरी भागासाठी पिण्याचे पाणी तथा शेती सिंचनाचे पाणी आरक्षित करताना बाष्पीभवनाचा अंदाज घेऊन करण्यात येते. परिणामी बर्‍याचदा अंदाज चुकत होते. परिणामस्वरूप हा निर्णय घेण्यात आला आहे. साधारणत: राज्यातील मोठय़ा व मध्यम स्वरूपाच्या प्रकल्पांवर प्रकल्प निर्मितीदरम्यानच हे बाष्पीभवन मापक यंत्र लावण्यात येतात. मात्र विदर्भामधील काही छोट्या प्रकल्पांवर ते लावण्यात आले नव्हते. त्यामुळे राज्य शासाने गेल्या वर्षी अर्थात २0१६ मध्ये राज्यातील पाचही महामंडळांना लिखित स्वरूपात पत्र पाठवून अनुषंगिक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते. त्याची प्रक्रिया आता वेग घेत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रकल्पांवर आधीपासूनच सुविधा आहेत. राज्य शासनाने त्यानुषंगाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळालाही पत्र पाठवले होते. त्यात एकूण १६ प्रकल्प समोर आले आहेत. या प्रकल्पांच्या भिंतीलगत मोकळ्य़ा जागेत जेथे सावली येणार नाही आणि अन्य उपद्रव राहणार नाही, अशा ठिकाणी हे पॅन इव्हॅपुरेशन मीटर बसविण्यात येईल.

या प्रकल्पांचा आहे समावेशबुलडाणा जिल्हय़ातील मोठय़ा प्रकल्पांपैकी नळगंगा, मध्यम प्रकल्पांपैकी ज्ञानगंगा, कोराडी, पलढग, मस, मन, तोरणा, उतावळी आणि लघू प्रकल्पांपैकी मांडवा, व्याघ्रा नाला, बोरखेडी, ढोरपगाव, मासरूळ, विद्रूपा, करडी, ब्राह्मणवाडा या प्रकल्पांवर ही यंत्रे बसविण्यात येणार आहेत. नळगंगा प्रकल्पासह खडकपूर्णा आणि पेनटाकळी प्रकल्पावर ही यंत्रे पूर्वी बसविण्यात आलेली होती; मात्र नळगंगा प्रकल्पावरील एक यंत्र नादुरुस्त झाले होते. त्यामुळे त्याचा समावेश करण्यात आला आहे. नाशिक येथील मेरी संस्थेने ही यंत्रे बनवली असून प्रती यंत्र ८0 हजार रुपये खर्च त्यास असून १२ लाख ८0 हजार रुपये किमतीची ही यंत्रणे सध्या बुलडाणा पाटबंधारे विभाग, बुलडाणाला प्राप्त झाली आहेत.

आतापर्यंत अंदाजानुसार होत होते मापनप्रारंभी एकूण जलसाठय़ापैकी जवळपास ३0 टक्के पाण्याचे वर्षभरात बाष्पीभवन होत असल्याचा अंदाज होता. दरम्यान, खामगाव, मलकापूर, मेहकर, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा या पट्टय़ात वाढते तापमान पाहता ३२ टक्के पाण्याचे बाष्पीभवन होत होते. बुलडाणा परिसरात हे प्रमाण २७ टक्क्यांच्या आसपास होते.

११ वर्षांपूर्वी झाला अभ्यासनाशिक येथील मेरी संस्थेने ११ वर्षांपूर्वी राज्यातील नदी खोरे, प्रकल्पांचा बाष्पीभवनासंदर्भात अभ्यास केला होता. पसरट प्रकल्पांतील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग अधिक असल्याचे त्यावेळी निदर्शनास आले होते. त्यानंतर अनुषंगिक काही निर्णय घेण्यात आले होते.

हा होईल फायदा!ही यंत्रे बसविल्यानंतर उपरोक्त प्रकल्पांवरून प्रतीदिन किती पाण्याचे बाष्पीभवन होते, याचा अंदाज येऊन महिना, ऋतू आणि वार्षिक बाष्पीभवनाचा अंदाज येईल. त्यामुळे प्रकल्पातील पाणी पिण्यासोबतच सिंचनासाठी किती प्रमाणात आरक्षती करता येईल, याचा अचूक अंदाज पाटबंधारे मंडळाला येईल. त्याचा शेतकर्‍यांना मोठा फायदा होऊन सिंचन कार्यक्रम व्यापकस्तरावर राबवणे सोपे होईल. बुलडाणा जिल्हय़ातील महत्तम सिंचन क्षमता ३१ टक्के असली तरी प्रत्यक्षात त्याच्या तुलनेत अत्यल्प प्रमाणात सिंचन होते. ही टक्केवारी वाढविण्यास यामुळे मदत होईल.