शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण मासात उभारले पाच वनराई बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 11:16 IST

Environment : बीजसंकलन, बीजारोपण, वृक्षारोपण आणि खामगाव परिसरात पाच वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : ५ जून ते ५ जुलै या कालावधीत विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवित सृष्टीमंगलम संस्थेने पर्यावरण मास साजरा केला. यामध्ये बीजसंकलन, बीजारोपण, वृक्षारोपण आणि खामगाव परिसरात पाच वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली.देशात श्रावण मास, अधिक मास ,कार्तिक मास मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. अशीच एक संकल्पना पर्यावरण मास म्हणून येथील सृष्टी मंगलम प्रतिष्ठाण, खामगावच्या वतीने ५ जून जागतिक पर्यावरण दिनापासून ते ५ जुलै २०२१ यादरम्यान राबविण्यात आली. या माध्यमातून शहरालगतच्या बोडख्या पडलेल्या टेकड्यांवर वृक्षारोपण तथा बीजारोपण करण्यात आले.  यामध्ये मुख्यत: घाटपुरी शिवारातील सोनबर्डी, लेकुरवाडी व नंदाखोरी तसेच सोबतच सजनपुरी येथील हंड्याबरड, तपोवन, ॠषिसंकुल आणि जनूना शिवारातील टेकडीवरील परिसरात बीजसंकलन, बीजारोपण, वृक्षारोपण यासोबतच भारतीय कमळ रोपण व वनराई बंधारा निर्माण करून मोठ्या उत्साहात पर्यावरण मास साजरा करण्यात आला.  सृष्टी मंगलम प्रतिष्ठानचे संस्थापक संजय गुरव यांनी शहरातील इतरही सामाजिक कार्यकर्ते व संस्थांना या उपक्रमात सामील करून घेतले. या पर्यावरण मासदरम्यान दृष्टीस पडणारे प्राणी, पक्षी, कीटक यांची ओळख व अभ्यास करण्यात आला. या उपक्रमात वयवर्ष १५ ते ७० दरम्यानच्या निसर्गप्रेमींनी सहभाग नोंदवला. यामध्ये सृष्टी मंगलम प्रतिष्ठाणसोबतच विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, तरुणाई फाउंडेशन, लायन्स क्लब संस्कृती, राष्ट्रीय रहित सेना, शिक्षक, व्यापारी सहभागी झाले.पर्यावरणप्रेमींचा सहभाग! n कलाध्यापक संजय गुरव यांची ही संकल्पना प्रत्यक्ष साकार करण्यासाठी  किशोर भागवत, वीरेंद्र शहा,चंद्रकांत केडीयाँ, राजेंद्रसिंग राजपूत, सौ. राजपूत, मंगला गुरव,  अमोल जोशी, मंगेश वानखेडे, गौरव इंगळे, गौरव वानखेडे, मंजितसिंग शिख, राजेश कोल्हे, अविनाश सोनटक्के, गोपाल पवार, तेजस्वी भुंबरे, श्रृती वारकड, विकास आंबेकर,  अभय अग्रवाल,  अजय अग्रवाल, नीताताई बोबडे यांनी सहकार्य केले.

‘माळ तिथे ताळ’ उपक्रमात लावली एक हजार झाडे!   ‘माळ तिथे ताळ’ या उपक्रमांतर्गत शहरालगतच्या माळावर (टेकडीवर) ताळ फळाच्या एक हजार बीजांचे रोपण केले.   तसेच वड, पिंपळासोबतच बूच (बकान) वृक्षाची तीन फुट उंचीच्या ३०० रोपांचीही लागवड करण्यात आली. १ जुलै ते ५ जुलै यादरम्यान लेकुरवाडी टेकडीवर व नंदाखोरी परिसरात पाच वनराई बंधारे निर्माण करण्यात आले. 

टॅग्स :environmentपर्यावरणkhamgaonखामगाव