शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा येथे पार पडला भाजपा दिव्यांग सेलचा रोजगार मार्गदर्शन मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 13:41 IST

बुलडाणा : सामाजिक न्याय भवन येथे भाजपा दिव्यांग सेलच्या अंतर्गत दिव्यांगासाठीच्या रोजगार व मार्गदर्शन मेळावा ९ डिसेंबर रोजी पार पडला.

ठळक मुद्देनामदेवराव डोंगरदिवे यांनी अपंगांच्या विविध समस्या व्यासपीठावरून व्यक्त केल्या.

बुलडाणा : सामाजिक न्याय भवन येथे भाजपा दिव्यांग सेलच्या अंतर्गत दिव्यांगासाठीच्या रोजगार व मार्गदर्शन मेळावा ९ डिसेंबर रोजी पार पडला. यावेळी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष नामदेवराव डोंगरदिवे व प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे जिल्हा महामंत्री विश्वनाथ माळी, भारत स्वच्छता अभियानाचे गणेश पाटील, दत्तात्रय ठाकरे, पी.पी.पवार, प्रताप जाधव आदी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणातून नामदेवराव डोंगरदिवे यांनी अपंगांच्या विविध समस्या व्यासपीठावरून व्यक्त केल्या. त्यामध्ये नोकरीचा प्रश्न, घरकुलाचा प्रश्न, व्यवसायासाठी जागा, कर्ज प्रकरण, दारिद्रय रेषा रेशन कार्ड समायोजन, ३ टक्के विकास निधी अपंगांच्या प्रमाणपत्रांचा प्रश्न, अपंगांच्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मोफत शिक्षण या व इतर विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. या विषयाला अनुसरून भाजपाचे महामंत्री विश्वनाथ माळी यांनी वरील सर्व प्रश्न पालकमंत्री तथथा मुख्यमंत्री महाराष्टÑ राज्य तसेच विविध विभागाचे अधिकारी यांचेकडे मार्गी लावण्यासाठी सोबत राहील, अशी ग्वाही दिली आहे. या कार्यक्रमात भारत स्वच्छता अभियानाचे गणेश पाटील यांनी माहिती देऊन ज्याठिकाणी आपल्याला घाण व कचरा दिसल्यास लगेच अ‍ॅपवर लोड करून पाठविण्याचे शिकविले. प्रास्ताविक ठाकरे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन पी.पी.पवार यांनी केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाBJPभाजपा