शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
2
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
5
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
6
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
7
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
8
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
9
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
10
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
11
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
12
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
13
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
14
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
15
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
16
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
17
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
18
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
19
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
20
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
Daily Top 2Weekly Top 5

बायोमॅट्रिककडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 18:27 IST

 ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांची बायोमॅट्रिकवर नोंद होत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी अशा कर्मचाऱ्यांवर कार्यवाहीचे आदेश देवून  बायोमॅट्रिकची सक्ती केली आहे.

ठळक मुद्देअधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वाढत्या गैरहजेरीमुळे शासनाने बायोमॅट्रीक यंत्रणा बंधनकारक केली आहे.ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित रहात नाहीत, अनेक दिवस ते ग्रामपंचायतीकडे फिरकतच नाहीत. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाºयांना बायोमॅट्रीकची सक्ती केली आहे.

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : तीन हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची बायोमॅट्रिक मशीनद्वारे येण्याची व जाण्याची नोंद करणे बंधनकारक आहे. मात्र  जिल्ह्यात  ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांची बायोमॅट्रिकवर नोंद होत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी अशा कर्मचाऱ्यांवर कार्यवाहीचे आदेश देवून  बायोमॅट्रिकची सक्ती केली आहे. त्यामुळे आता बायोमॅट्रिकपासून दूर पळणाºया कर्मचाऱ्यांवर चाप बसणार आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाºया  अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वाढत्या गैरहजेरीमुळे शासनाने बायोमॅट्रीक यंत्रणा बंधनकारक केली आहे. त्यासाठी ग्रामविकास विभागाच्यावतीने जिल्हा परिषदेला केलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात प्रामुख्याने तीन हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जि.प. शाळेमधील शिक्षक, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, ग्रामसेवक यांच्यासह अन्य कर्मचारी व अधिकाºयांनीही दररोज बायोमेट्रिक यंत्रावरच हजेरी  द्यावी, असे सांगितले होते. शासकीय अधिकारी व कर्मचाºयांची गैरहजेरी टाळण्यासाठी  बायोमॅट्रिक मशीनची उपलब्धता करून घेतल्यानुसार ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी प्रत्येक दिवसाची बायोमॅट्रिक मशीनमध्ये कार्यालयात येण्याची व जाण्याची नोंद करणे बंधनकारक आहे. त्यानुसार ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व कार्यालयातील अधिकारी व  कर्मचाºयांनी १ एप्रिल २०१८ पासून हजेरीसाठी बायोमेट्रिक मशिन दिल्या आहेत. परंतू, जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील  कार्यरत अधिकारी व कर्मचारी बायोमॅट्रिक मशीनवर नोंद करत नाहीत. त्यामुळे ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित रहात नाहीत, अनेक दिवस ते ग्रामपंचायतीकडे फिरकतच नाहीत, कर्मचाºयांच्या अनुपस्थितीमुळे अनेक कामकाज खोळंबले आहे, अशी सतत ओरड होते. अशा दांडी बहाद्दर कर्मचाºयांना आळा घालण्यासाठी ५ जुलै रोजी जिल्हाधिकारी व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाºयांना बायोमॅट्रीकची सक्ती केली आहे. तसेच जे अधिकारी व कर्मचारी बायोमॅट्रिकवर नोंद करणार नाहीत, त्यांच्यावर संबंधित कार्यालयप्रमुखांनी प्रशासकीय कार्यवाही करावी, असे आदेश दिले आहेत. 

 बायोमॅट्रिक गटविकास अधिकाऱ्यांच्या खांद्यावरग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी बायोमॅट्रिक यंत्रणा बंधनकारक करण्यात आल्यानंतर त्याबाबत संबंधीत जिल्हास्तरावरील व तालुकास्तरावरील सर्व यंत्रणांना दखल घ्यावी लागणार आहे. तसेच यासंदर्भात गटविकास अधिकाऱ्यां ना तालुकास्तरावरील व ग्रामस्तरावरील सर्व कार्यालयांना तात्काळ आदेश देवून वेळोवेळी आढावा घ्यावा लागणार आहे. बायोमॅट्रिक यंत्रणेचा सर्व अहवाल पाठविण्याचा जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांच्या खांद्यावर दिली आहे.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाgram panchayatग्राम पंचायत