शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

‘आमचं गाव, आमचा विकास’ वर जोर द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 01:51 IST

बुलडाणा: ‘आमचे गाव, आमचा विकास’ योजनेंतर्गत जिल्ह्यातील ८६९ ग्रामपंचायतींचे विकास आराखडे पूर्णत्वास जाऊन त्यास अंतिम मान्यता मिळाली असली तरी मंजूर आराखडे प्लॅन प्लसमध्ये अपलोड करण्याचा वेग वाढविण्यासोबतच या उपक्रमावर यंत्रणेने जोर देऊन कामांमधील विलंब टाळण्याबाबत जिल्हा परिषद यंत्रणेला सूचना दिल्या आहेत.

ठळक मुद्दे ग्रामविकास सचिवांचे व्हीसीमध्ये निर्देश: आराखड्यांच्या अंमलबजावणीला नको विलंब!

नीलेश जोशी। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: ‘आमचे गाव, आमचा विकास’ योजनेंतर्गत जिल्ह्यातील ८६९ ग्रामपंचायतींचे विकास आराखडे पूर्णत्वास जाऊन त्यास अंतिम मान्यता मिळाली असली तरी मंजूर आराखडे प्लॅन प्लसमध्ये अपलोड करण्याचा वेग वाढविण्यासोबतच या उपक्रमावर यंत्रणेने जोर देऊन कामांमधील विलंब टाळण्याबाबत जिल्हा परिषद यंत्रणेला सूचना दिल्या आहेत.मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या व्हीसीमध्ये ग्रामविकास विभागाचे सचिव आशीष गुप्ता यांनी याबाबत निर्देशित केले असून, ज्या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामपंचायत भवन बांधकाम झालेले नसेल ते पूर्णत्वास नेण्यासोबतच गावातील आपले सरकार केंद्र अधिक सक्षम कसे करता येईल, यावर जोर देऊन अगदी बँकिंग सुविधाही स्थानिक पातळीवर ग्रामस्थांना मिळतील, ही बाब गांभीर्याने हाताळावी, असे स्पष्ट केले आहे. त्या दृष्टीने बुलडाणा जिल्ह्याचे काम समाधानकारक असले तरी यावर अधिक जोर दिला जावा, असे संकेतच  व्हीसीमध्ये दिले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुुखराजन एस. आणि पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय चोपडे हे प्रामुख्याने या व्हीसीला उपस्थित होते. दरम्यान, अद्यापही बुलडाणा जिल्ह्यातील मंजूर झालेल्या ग्रामपंचायतींच्या विकास आराखड्यांपैकी ८२ ग्रामपंचायतींचे आराखडे हे प्लॅन प्लसमध्ये अपलोड झालेले नाहीत. त्या दृष्टीने कामाचा वेग वाढविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असून, जिल्ह्यातील यासंदर्भातील कामे जवळपास ९५ टक्के झाल्याचा दावा जिल्हा परिषद यंत्रणेने केला आहे. सोबतच जिल्ह्याचे काम तुलनेने चांगले असल्याचे ग्रामविकास सचिवांनी सांगितले.

तीन वर्षात २२४ कोटी४१४ व्या वित्त आयोगातून जिल्ह्यातील या कामांसाठी ग्रामपंचयातींना जिल्हा परिषदेमार्फत आतापर्यंत २२४ कोटी रुपये मिळाले असून, यापैकी ५६ टक्के रक्कम कामांवर खर्च करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षामध्ये जवळपास चार टप्प्यात ही रक्कम जिल्ह्यातील गावाच्या विकासासाठी उपलब्ध झालेली आहे. त्यातून उपरोक्त खर्च करण्यात आला आहे. दरम्यान, चालू आर्थिक वर्षासाठीचे ११ कोटी रुपये अद्याप राज्य शासनाकडून उपलब्ध झालेले नाहीत. ते मिळाल्यास या कामातील वेग आणि सातत्य टिकविण्यास मदत होईल, असे सांगितल्या जात आहे.

अंमलबजावणी स्तरावर हवा वेग!४आमचं गाव, आमचा विकास अंतर्गत पहिल्या दोन वर्षामध्ये प्रत्यक्ष ग्रामपातळीवरी सूक्ष्म नियोजन करून विकास आराखडे (डीपीआर) बनविण्यातच प्रशाकीय यंत्रणेचा प्राधान्याने वेळ गेलेला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तापर्यंत हे गावनिहाय डीपीआर तयार होणे गरजेचे होते; मात्र त्यास विलंब झाला होता. आता हे विकास आराखड्यांचे काम पूर्णत्वास गेल्याने प्रत्यक्ष अंमलबजावणन स्तरावर गावातील विकास कामांचा वेग वाढवून कामांची गुणवत्ता व दर्जा राखल्या गेला पाहिजे. त्यासाठी यंत्रणेला अधिक प्रभावीपणे कामे करावी लागणार आहेत. मधल्या काळात प्रभारींच्या खांद्यावर पंचायत विभागाचे ओझे होते. त्यामुळे ही कामे तुलनेने कासवगतीने झालेली होती. आता ते चित्र काही प्रमाणात बलदल असल्याचे चित्र आहे.गावातील आपलं सरकार केंद्र सक्षम करण्यास प्राधान्य देण्यात येऊन ज्या गावात ग्रामपंचायत भवन नाहीत, तेथे ते उभारण्याची कार्यवाही व्हावी, नादुरुस्त संगणक दुरुस्त करून ग्रामपातळीवरच ग्रामस्थांना बहुतांश सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जावेत, अशा सूचना मंगळवारच्या व्हीसीमध्ये देण्यात आल्या आहेत.- संजय चोपडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणा