शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन अर्जात तांत्रिक अडचणींचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 11:09 IST

पीक विमा काढण्याची मुदत ३१ जुलै पर्यंत असल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : खरीप पीक विम्याचे आॅनलाईन अर्ज भरताना शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पीक विमा काढण्याची मुदत ३१ जुलै पर्यंत असल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे.महाभूमीलेख, आधार आणि विमा कंपनीची वेबसाईट एकाच वेळी सुरळीत सुरू राहील्यास आॅनलाईन अर्जाची प्रक्रीया पूर्ण होते. या तीनपैकी काही वेबसाईटमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने पीक विमा काढण्यापासून अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दरवर्षी शेतकऱ्यांना अनियमीत पावसाचा फटका बसतो. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळावा, यासाठी पीक विमा योजना सुरू केली आहे. यावर्षीपासून ही योजना तीन वर्षांसाठी लागू करण्यात आली आहे.शेतकºयांना शेतमालच्या अनिश्चित उत्पन्नाची नुकसान भरपाई सामुहिक स्वरूपात मिळावी, या उद्देशाने ही योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. शेतकºयांना प्रतिकुल हवामान घटकांमुळे पेरणी, लावणी, उगवण न होणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान, पिक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, काढणी पश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती याबाबींकरीता विम्याचे संरक्षण मिळणार आहे.विम्याचे अर्ज भरण्यासाठी ३१ जुलै ही मुदत आहे. मात्र; गत दोन दिवसांपासून ‘लोड’ वाढल्याने विमा कंपनीचे सर्व्हरची गती मंदावलीे आहे. त्यामुळे, अनेक शेतकºयांचे अर्ज भरल्याच गेले नाहीत. विम्याचे अर्ज भरताना सर्वात आधी आधार प्रमाणिकरण करण्याची गरज आहे. त्यानंतर सात बारा प्रमाणीत करण्यात येतो. या बाबींची पडताळणी झाल्यानंतर फॉर्म भरला जातो. अनेक शेतकरी एकाच वेळी फार्म भरत असल्याने अडचणी येत आहेत.

एक अर्ज भरण्यासाठी लागतो अर्धा तासग्रामीण भागात वीजेचा लपंडाव सुरू आहे. तसेच नेटवर्कही राहत नसल्याने पिक विम्याचे अर्ज भरण्यासाठी शेतकºयांना ताटकळत रहावे लागत आहे.सात बारासाठी आठ ते दहा वेळा गट नंबर टाकल्यानंतर प्रमाणीकरण होत असल्याने शेतकºयांचा वेळ जात आहे. तांत्रिक बिघाडामुळे एक अर्ज भरण्यासाठी २५ ते ३० मिनीट लागत आहेत.तसेच मिश्र पिक एकत्र टाकल्यास अर्ज सबमिट होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, प्रत्येक वेळी एका एका पिकाची निवड करावी लागत असल्याने अर्ज भरण्यास विलंब होत आहे.

सर्व शेतकरी एकाच वेळी आॅनलाईन अर्ज भरत असल्याने अडचणी येत आहेत. सर्व्हरची क्षमता वाढविण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविला आहे. ही अडचण लवकरच दूर होणार आहे.-विजय सरोदे,प्रभारी तालुका कृषी अधिकारी,लोणार

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी