बुलडाणा: बुलडाणा जिल्ह्यातील १३ पंचायत समितींच्या सभापती, उपसभापती पदाच्या झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत चार पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसचे सभापती निवडून आले. एका पंचायत समितीमध्ये काँग्रेस पुरस्कृत सभापती निवडून आला असून, शिवसेना- भाजपने पाच पंचायत समि तींवर भगवा फडकवला. राष्ट्रवादी काँग्रेसने दोन पंचायत समितींमध्ये सत्ता कायम ठेवली असून, एक पंचायत समिती भारिप- बहुजन महासंघाने काबिज केली आहे. पंचायत समिती सभापती पदाचा अडिच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर, रविवार, १४ सप्टेबर रोजी सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुका घेण्यात आल्या. यावेळी चिखली, मोताळा, लोणार आणि खामगाव पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे सभापती निवडून आले, तर मलकापूर पंचायत समि तीमध्ये काँग्रेस पुरस्कृत अपक्ष सभापती झाला. बुलडाणा पंचायत समितीमध्ये आघाडीचे बहुमत अस ताना जिल्हा मुख्यालयी असलेली ही पंचायत समिती शिवसेनेने काँग्रेसच्या हातून हिसकावून घेतली. काँग्रेसचा व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य मतदानाला गैरहजर राहीला, तर काँग्रेसच्या एका सदस्याने विरोधात मतदान केल्याने काँग्रेसला पराभव पत्कारावा लागला. मेहकरमध्ये काँग्रेसचा एक सदस्य फुटल्याने उपसभापती पद काँग्रेसला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसने देऊळगावराजा आणि सिंदखेडराजा पंचायत समितीवरील वर्चस्व कायम ठेवले. त्याचप्रमाणे भारिप- बहुजन महासंघाने शेगाव पंचायत समितीवरील स्वत:चा ताबा कायम ठेवला आहे. संग्रामपूर, जळगाव जामोद आणि नांदुरा पंचायत समितींमध्ये भाजपचे सभापती विराजमान झाले.
बुलडाणा जिल्ह्यातील १३ पंचायत समितींच्या निवडणुका
By admin | Updated: September 15, 2014 01:00 IST