शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रद्धेतून भावानेच केला वृद्ध बहिणीचा खून, चांडोळ येथील घटना; चार आरोपी अटकेत

By भगवान वानखेडे | Updated: September 29, 2022 20:36 IST

बहिणीने भानामती (करणी कवटाळ) करुन मुलाला मारुन टाकले. या संशयातून चक्क भावानेच कुटुंबियांच्या मदतीने वृद्ध बहिणीचा खुन केला.

धाड / रुईखेड मायंबा (जि.बुलढाणा) : बहिणीने भानामती (करणी कवटाळ) करुन मुलाला मारुन टाकले. या संशयातून चक्क भावानेच कुटुंबियांच्या मदतीने वृद्ध बहिणीचा खुन केला. ही धक्कादायक घटना बुलढाणा तालुक्यातील चांडोळ येथे २९ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणातील चार आरोपीविरुद्ध धाड पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली आहे.

धाड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चांडोळ येथील मृतक धनाबाई सुभाष गोमलाडू (६०) यांचे शेत पासोडी-चांडोळ रस्त्यावर आहे. धनाबाई गोमलाडू या २८ सप्टेंबर रोजी शेतामध्ये गेल्या होत्या, परंतु त्या सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने त्यांचा मुलगा व नातेवाईकांनी गावात तसेच आजु-बाजुच्या परिसरात शोध घेतला. तेव्हा शामराव राऊत यांच्या शेतातील विहिरीत रात्री उशिरा प्रेत पाण्यावर तरंगताना दिसून आले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अनिल पाटील हे पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन तपास सुरु केला. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

फिर्यादनंतर आली तपासाला गतीघटनेची फिर्याद मृतक महिलेचा जावाई गेंदुसिंग भाऊलाल पाकळ यांनी धाड पोलिसांत दिली. त्यामध्ये मृतक महिलेने आमच्या तरुण मुलास भानामती करून मारल्याचा संशय मारेकऱ्यांना होता. मुलाच्या मृत्यूचा वचपा काढण्यासाठी चक्क भावनेच बहिणीचा खून केला असे तक्रारीत म्हटले होते. अशा फिर्यादीनंतर पोलिसांनी आरोपी हिरालाल रतनसिंग बलावणे (६२), गोपीबाई हिरालाल बलावणे(५८), संजय हिरालाल बलावणे (३५) व रंजित हिरालाल बलावणे (४०) या चारही आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDeathमृत्यू