बुलडाणा जिल्ह्यात नऊ दिवसात आठ टँकरला ‘ग्रीन सिग्नल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 12:24 PM2020-05-30T12:24:58+5:302020-05-30T12:25:09+5:30

मे अखेरीस पाणीटंचाई निर्माण झाल्याने गेल्या नऊ दिवसात आठ टँकरला ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे.

Eight tankers get 'green signal' in nine days in Buldana district | बुलडाणा जिल्ह्यात नऊ दिवसात आठ टँकरला ‘ग्रीन सिग्नल’

बुलडाणा जिल्ह्यात नऊ दिवसात आठ टँकरला ‘ग्रीन सिग्नल’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात मान्सूनच्या तोंडावर पाणीटंचाई जाणवायला सुरूवात झाली आहे. टंचाई निवारणार्थ जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. मे अखेरीस पाणीटंचाई निर्माण झाल्याने गेल्या नऊ दिवसात आठ टँकरला ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे.
मगील वर्षी मे महिन्यात पाणी टंचाईच्या झळा जिल्ह्याला सहन कराव्या लागल्या. त्यामुळे टँकरची संख्याही वाढली होती. अनेक गावांमध्ये टंचाई निवारणार्थ विहिर अधिग्रहण करण्यात आले होते. पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पावसाचे प्रमाण वाढले होते. अनेक नदी, नाले, विहिर तुडूंब भरले होते. जिल्ह्यातील अनेक प्रकल्प ओव्हर फ्लो झाले होते. पाणी पातळी वाढल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवली नाही. आता मान्सून तोंडावर आलेला असताना मे अखेरीस पाणी टंचाई जाणवायला सुरूवात झाली आहे. टंचाई निवारणार्थ उपाययोजनांना वेग आला आहे. गेल्या नऊ दिवसांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी आठ टँकरला मान्यता देण्यात आली आहे. सुरू करण्यात आलेले हे सर्व टँकर ग्रामीण भागासाठी आहेत. त्यामध्ये मोताळा तालुक्यातील टेकडी तांडा, बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा, हनवतखेड, चिखली तालुक्यातील मेरा. बु, बुलडाणा तालुक्यातील ढासाळवाडी, सावळा, पाडळी व चिखली तालुक्यातील कोलारा या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकी एक टँकर सुरू करण्यात आले आहे.
 
अशा केल्या उपाययोजना
मागील आठवड्यात पाणीटंचाई निवारणार्थ देऊळगाव राजा तालुक्यातील सात, मलकापूरमधील दोन, मेहकर तालुक्यातील १३, लोणारमधील चार, सिंदखेड राजामधील एक, मोताळा तालुक्यातील सात, जळगांव जामोदमधील १५, शेगांव एक व नांदुरा तालुक्यातील एका गावासाठी ४८ विंधन विहीरीला मान्यता देण्यात आली आहे. नऊ कुपनलिकांची कामेही मंजूर आहेत. एकूण ५१ गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी उपाय योजना करण्यात आल्या आहेत.


टेकडी तांडा येथे पिण्याच्या पाण्याचे टँकर
दिवसाला एक टँकर टंचाई निवारणार्थ मंजूर करण्यात येत आहे. मोताळा तालुक्यातील टेकडी तांडा गावाला पिण्याच्या पाण्यासाठी एक टँकर सुरू करण्यासाठी २९ मे रोजी मान्यता देण्यात आली आहे. टेकडी तांडा येथील लोकसंख्या ३५० असून टँकरद्वारे गावाला दररोज १२ हजार ५० लीटर्स पाण्याच्या पुरवठा केल्या जाणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार या गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्यााची साधने या बाबी लक्षात घेवून टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे.

Web Title: Eight tankers get 'green signal' in nine days in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.