शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

शैक्षणिक विकासात 'इझी टेस्ट'चा हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 16:36 IST

यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून इझी टेस्टमध्ये पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती चाचणी समाविष्ट करण्यात आली आहे.

- सोहम घाडगे लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात 'इझी टेस्ट अ‍ॅप्स'चा महत्वपूर्ण हातभार लागला आहे. मागील वर्षात या अ‍ॅपच्या माध्यमातून आठवी ते दहावीच्या गणित व विज्ञान विषयाच्या प्रकरणनिहाय २४४ चाचण्या झाल्या. त्याद्वारे जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ३४७ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन पेपर सोडविले. यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून इझी टेस्टमध्ये पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती चाचणी समाविष्ट करण्यात आली आहे.बुलडाणा जिल्ह्यात पहिली ते बारावीचे ५ लाख ४४ हजार विद्यार्थी आहेत. ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांना पायाभूत अभ्यासक्रमाची ओढ लागावी, त्यांचा शैक्षणिक विकास व्हावा या उद्देशाने माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझाडे यांच्या संकल्पनेतून ७ जुलै २०१८ पासून जिल्ह्यात पायाभूत अभ्यासक्रमाची मुहुर्तमेढ रोवण्यात आली. विद्यार्थ्यांना इझी टेस्ट अ‍ॅप डाऊनलोड करुन मोबाईलवरुन ही टेस्ट देण्याची व्यवस्था करण्यात आली. या शैक्षणिक वर्षापासून इझी टेस्टमध्ये पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती चाचणी समाविष्ट करण्यात आली आहे. पाचवी व आठवी शिष्यवृत्ती चाचणीचे प्रत्येकी १०० पेपर असणार आहेत. विद्यार्थ्यांना संकल्पना स्पष्ट होण्यासाठी दररोज सायंकाळी ८ वाजता एका विषयावर व्हिडीओच्या माध्यमातून तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. जास्तीत जास्तीत विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले पाहिजेत यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची चाचणी घेण्याची व्यवस्था आता करण्यात आली आहे. गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल हे विषय अंतभूत करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पहिली ते दहावीच्या सर्व वर्गांचे व्हिडीओ प्रकरणनिहाय विद्यार्थ्यांना नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात आले आहे.आजचे युग स्पर्धेचे आहे. प्रत्येक क्षेत्रात नवनवीन संकल्पना दाखल होतात. शैक्षणिक क्षेत्र तर खूप विस्तृत आहे. विद्यार्थ्यांना पायाभूत शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. कौशल्य विकास होवून रोजगारभिमूखता विकसित व्हायला हवी. त्यादृष्टीने शिक्षण विभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. स्पर्धेच्या युगात आपला विद्यार्थी टिकला पाहिजे यासाठी त्याची तयारी झाली पाहिजेत.याकरिता प्रयत्न करणेचे आहे. इझी टेस्ट अ‍ॅप्स या संकल्पनेचा विद्यार्थ्यांच्या विकासात हातभार लागत असल्याचे दिसून येत आहे.

मराठी, इंग्रजी भाषेत चाचणी उपलब्धइझी टेस्टच्या माध्यमातून पाचवी ते दहावीच्या गणित, विज्ञान, इतिहास, भुगोल या विषयाची चाचणी मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेतून उपलब्ध करण्यात येणार आहे. महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी पाचवी ते सातवी तर दुसºया व चौथ्या शनिवारी आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना चाचणी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सराव करता यावा, त्यांच्या क्षमता समजून घेण्यास मदत व्हावी हा यामागचा उद्देश आहे.आजच्या संगणकीय व स्पर्धेच्या युगात 'इझी टेस्ट अ‍ॅप्स' मुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होण्यास मदत होणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ही आॅनलाईन चाचणी सोडवावी. भविष्यात याचे चांगले परिणाम दिसून येतील.- डॉ. श्रीराम पानझाडेमाध्यमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाEducationशिक्षणStudentविद्यार्थी