शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ई-टिकिटिंग मशीन झाली बेभरवशाची; बिघाड होण्याचे प्रमाण वाढले ​​​​​​​

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 15:37 IST

बुलडाणा: जिल्ह्यातील एसटी महामंडळाकडे जवळपास ९५० इलेक्ट्रॉनिक टिकिटिंग मशीन (ईटीआयएम) आहेत; परंतु सध्या या ई-टिकिटिंग मशीनमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढल्याने जुनी पंचिंग तिकिटे प्रवाशांना फाडून दिली जात आहेत.

ठळक मुद्देई-टिकिटिंग मशीनच्या बॅटरीच्या अडचणी वाढल्याने ही मशीन बेभरवशाची झाली आहे.आता हे जुने तिकीट वाहकांसह प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.त्यामुळे प्रवाशांना या तिकीटाचे एक वेगळेच आकर्षण वाटले.

- ब्रह्मानंद जाधव  बुलडाणा: जिल्ह्यातील एसटी महामंडळाकडे जवळपास ९५० इलेक्ट्रॉनिक टिकिटिंग मशीन (ईटीआयएम) आहेत; परंतु सध्या या ई-टिकिटिंग मशीनमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढल्याने जुनी पंचिंग तिकिटे प्रवाशांना फाडून दिली जात आहेत. ई-टिकिटिंग मशीनच्या बॅटरीच्या अडचणी वाढल्याने ही मशीन बेभरवशाची झाली आहे; मात्र वाहकांना या मशीनच्या तिकिटांची सवय लागल्याने आता हे जुने तिकीट वाहकांसह प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.राज्य परिवहन महामंडळ तिकीटाच्या कारणावरून नेहमीच चर्चेत असते. एसटी महामंडळाच्या होत असलेल्या आधुनिकतेकडे वाटचालीत अनेक अडचणी निर्माण होत आहेत. एसटी महामंडळाने २००८ मध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून खासगी कंपनीकडून ई-टिकिटिंग मशीन खरेदी केल्या. राज्यात जेवढे एसटी महामंडळाकडे वाहक आहेत, तेवढे ई-टिकिटिंग मशीन्स आहेत. जिल्ह्यात जवळपास ९५० ई-टिकिटिंग मशीन्सवर लाखोंची उलाढाल एसटी महामंडळाची सुरू आहे; परंतु गेल्या काही दिवसांपासून या यंत्रात वारंवार बिघाड होत असल्याचे दिसून येत आहे. ई-टिकिटिंग मशीन्समध्येच बंद पडत आहे. बॅटरीच्या व व्हिअरच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे वाहकांना ई-टिकिटिंग मशीन वापरणे अवघड झाले आहे. ई-टिकिटिंग मशीन खराब झाल्यानंतर काही वेळ एसटी बस रस्त्याच्या कडेलाच उभी केल्या जाते. त्यामुळे काही वाहकांनी पर्यायी व्यवस्था म्हणून जुन्या पद्धतीच्या पंचिंग तिकिटांचा वापर सुरू केला आहे. मेहकर-बुलडाणा जाणाऱ्या एसटी (क्र. एमएच-१४-बी-टी-०३१९) बसमध्ये गुरुवारी जुनी पंचिंग तिकिटे प्रवाशांना फाडून दिल्याचा प्रकार दिसून आला, तर आगारातील अनेक वाहकांकडे सध्या जुन्या पद्धतीचे ‘तिकीट ट्रे’चा ई-टिकिटिंग मशीनच्या सोबत ठेवले जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रवाशांना या तिकीटाचे एक वेगळेच आकर्षण वाटले.

ई-टिकिटिंग मशीन बंद पडल्यास पूर्वी वापरल्या जाणाºया पंचींग तिकीटाचा वापर करण्याच्या सूचना वाहकांना दिलेल्या आहेत. बॅटरीच्या व इतर काही तांत्रिक अडचणी ई-टिकिटिंग मशीनमध्ये निर्माण होतात. त्यामुळे जुन्या तिकीटाची ही पर्यायी व्यवस्था वाहकांकडे ठेवण्यात आली आहे.- संदीप रायलवार,विभाग नियंत्रक, राज्य मार्ग परिवहन महामंडळ, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाticketतिकिटstate transportएसटी