शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात बुलडाणा जिल्हा दुष्काळमुक्त करू - शांतिलाल मुथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 01:16 IST

सुलतानपूर : शासन, प्रशासन, पदाधिकारी तसेच शेतकरी बांधवांच्या  सहकार्याने विविध उपक्रम राबवून एका वर्षात जिल्हा दुष्काळमुक्त  करण्याचा मानस असून, तो प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ४ मार्चपासून  लोणार तालुक्यातील धरणांमधील गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ  होणार आहे. सोबतच शेतकर्‍यांच्या सुपीक जमिनीत तो टाकण्यात  येईल. शेतकर्‍यांनी या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेऊन आपापली शे ती सुपीक करावी, असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे संस्थापक  अध्यक्ष शांतिलाल मुथा यांनी येथे केले.

ठळक मुद्देसुलतानपूरमध्ये नियोजनाबाबत झाली बैठक मोठय़ा संख्येने होती शे तकर्‍यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कसुलतानपूर : शासन, प्रशासन, पदाधिकारी तसेच शेतकरी बांधवांच्या  सहकार्याने विविध उपक्रम राबवून एका वर्षात जिल्हा दुष्काळमुक्त  करण्याचा मानस असून, तो प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ४ मार्चपासून  लोणार तालुक्यातील धरणांमधील गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ  होणार आहे. सोबतच शेतकर्‍यांच्या सुपीक जमिनीत तो टाकण्यात  येईल. शेतकर्‍यांनी या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेऊन आपापली शे ती सुपीक करावी, असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे संस्थापक  अध्यक्ष शांतिलाल मुथा यांनी येथे केले.स्थानिक वेदांत आश्रमात २५ फेब्रुवारी रोजी शेतकर्‍यांसाठी आयोजित  सभेत ते बोलत होते. दरम्यान, आगामी सहा महिने हे काम चालणार  असून, यामुळे बुलडाणा जिल्ह्याला एक टीएमसी पाणीसाठा निर्माण  होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावेळी तहसीलदार सुरेश कव्हळे  यांनीदेखील या शेतकरी हिताच्या उपक्रमासाठी शासकीय सुट्यांचा  विचार न करता सर्वतोपरी महसूल प्रशासनाकडून त्यांच्या अखत्यारी तील  अधिकाराचा वापर करून सहकार्य करण्याची ग्वाही दिली.  कार्यक्रमाला जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र जैन, जयचंद भाटिया,  बाफना, भिकमचंद रेदासनी, तुषार बेदमुथा, मयूर गेल्डा, नीलेश नाहटा,  कृषी अधिकारी दांडगे, भैयासाहेब पाटील तसेच जिल्हा परिषद सदस्यप ती दिलीप वाघ, पंचायत समितीचे गटनेते डॉ. हेमराज लाहोटी, पंचायत  समिती सदस्यपती गजानन भोकरे, बाजार समितीचे शिवपाटील  तेजनकर, कांता पाटील, वामनराव झोरे, शिवप्रसाद सारडा, विजय  खोलगडे, दत्तात्रय शेवाळे, मधुकर जैन, ग्रामविकास अधिकारी मो तीराम डव्हळे, सतीश बोराळकर, मोहन जैन यांच्यासह गाव परिसरा तील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. या अभियानाबाबत सक्रियपणे  सहभागी होण्याचे ग्रामीण भागातील नागरिक सांगत आहेत.

खासगी टँकरने पाणी पुरवठासुलतानपुरात जानेवारीपासूनच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. १५  व्या, १६ व्या दिवशी अवघे २0 मिनिटे ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठा  केला जातो, अशी खंत ग्रामस्थांनी या कार्यक्रमात व्यक्त केली. येथून  हाकेच्या अंतरावर बोराखेडी तलाव असला, तरी सुलतानपूर मात्र  तहानलेले असून, खासगी टँकरने पाणी विक्री तेजीत आहे. त्यामुळे  शासन व प्रशासनाप्रती गावकर्‍यांमध्ये संताप आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाShantilal Muttha Foundationशांतीलाल मुथ्था फाउंडेशन