याप्रसंगी हातात तिरंगा घेऊन उभा असलेल्या युवकांसह उपस्थित शहरवासीयांनी एका आवाजात राष्ट्रगानाला प्रारंभ केला. आपले अमूल्य ५२ सेकंद तिरंगा झेंड्यासाठी, राष्ट्रगानाच्या प्रेमासाठी देण्याचे आवाहन एक वादळ भारताचं या चळवळीतील युवकांनी केले होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी साडेदहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यानजीक शहरातील नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. याप्रसंगी आयोजक युवकांच्या हातात भारत देशाची शान तिरंगा मोठ्या अभिमानाने डोलत होता. याप्रसंगी नगराध्यक्ष सुनीता शिंदे, पंचायत समितीच्या सभापती रेणुका बुरकुल, पालिकेच्या मुख्य अधिकारी निवेदिता घार्गे, वैद्यकीय अधीक्षक अस्मा शाहीन, ठाणेदार संभाजी पाटील, माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर, जिल्हा परिषद सदस्य मनोज कायंदे, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, कविश जिंतुरकर, तुकाराम खांडेभराड, उपनगराध्यक्ष पवन झोरे, प्राचार्य डॉ. गजानन जाधव, डॉ. रामदास शिंदे, नगरसेवक सुनीता सवडे, रेखा बोरकर, नंदन खेडेकर, मालन बी पठाण, पल्लवी वाजपे, रिता जिंतुरकर, शमीम बी. बागवान, सुषमा राऊत, गणेश सवडे, श्याम मुडे, गणेश बुरकुल, डॉ.योगेश कायंदे, राजेश इंगळे, नीलेश गीते, दशरथ राठोड, खाजा सिद्धिकी, दीपक कासारे, दीपक बोरकर, सय्यद करीम, जहीर पठाण, काशीफ कोटकर, संदीप कटारे, लालचंद डोंगरे, दीपक तिडके आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आकिब कोटकर, आकाश कासारे यांच्या मार्गदर्शनात एक वादळ भारताचं समूहाने पुढाकार घेतला होता.
सामूहिक राष्ट्रगानाने दुमदुमली बालाजीनगरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:31 IST