शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पत्रक न मिळाल्याने एसटीसमोर भाडेवाढीचा पेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 14:34 IST

बुलडाणा विभाग नियंत्रक कार्यालयास यासंदर्भातील पत्रकच मिळाले नसल्याने आजपासूनची भाडेवाढ कशा पद्धतीने लागू करायची हा पेच निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देराज्य परिवहन महामंडळाने तिकीट दरात १८ टक्के भाडेवाढ १५ जून पासून लागू करण्यात आली आहे१८ टक्के भाढेवाढीचा निर्णय होऊनही भाडेवाढीच्या दिवसापर्यंत पत्रक प्राप्त न झाल्याने भाडेवाढी संदर्भात वाहकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे बुलडाणा विभागांतर्गत शुक्रवारी पहाटे सुटलेल्या बसगाड्यांनी प्रवाशांना जुन्याच दराने भाडे आकारले.  

 - ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : इंधनाचे वाढते दर पाहता राज्य परिवहन महामंडळाने तिकीट दरात १८ टक्के भाडेवाढ १५ जून पासून लागू करण्यात आली आहे. मात्र बुलडाणा विभाग नियंत्रक कार्यालयास यासंदर्भातील पत्रकच मिळाले नसल्याने आजपासूनची भाडेवाढ कशा पद्धतीने लागू करायची हा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे बुलडाणा विभागांतर्गत शुक्रवारी पहाटे सुटलेल्या बसगाड्यांनी प्रवाशांना जुन्याच दराने भाडे आकारले.  कर्मचारी वेतनवाढ, डिझेलच्या दरात वाढ आणि देखभाल दुरुस्तीत वाढीमुळे एसटी महामंडळाने भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला होता. इंधन दरवाढीमुळे महामंडळावर दरवर्षी सुमारे ४६० कोटींचा बोजा वाढला आहे. कामगारांसाठी नुकतीच चार हजार ८४९ कोटींची वेतनवाढ करण्यात आली. त्यामुळे एसटी महामंडळावर आर्थिक बोजा पडला आहे. त्यामुळे तिकीट दरवाढ करण्याचा मार्ग एसटी महामंडळाने स्विकारला. राज्यभर १५ जूनच्या मध्यरात्रीपासून १८ टक्क्यांनी  भाडेवाढ करण्यात आली आहे. परंतू राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागाला १५ जूनपर्यंत भाडेवाढ संदर्भात कुठलेच पत्र मिळाले नाही. त्यामुळे भाडेवाढ कशी करायची? याचा मोठा प्रश्न बुलडाणा विभाग नियंत्रक कार्यालयासह जिल्ह्यातील सर्वच आगारप्रमुखांना पडला आहे. सर्वत्र १८ टक्के भाढेवाढीचा निर्णय होऊनही भाडेवाढीच्या दिवसापर्यंत पत्रक प्राप्त न झाल्याने भाडेवाढी संदर्भात वाहकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. परिणामी बुलडाणा विभांतर्गत १५ जून रोजी पहाटेपासून सुटणाºया सर्वच बसफेºयांचे  तिकीट भाडे हे जुन्याच दराने आकारणी करण्यात आले आहेत. या प्रकारामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. 

 भाडे आकारणी पाच रुपयांच्या पटीने१५ जूनपासून तिकिटाची भाडे आकारणी पाच रुपयांच्या पटीने करण्याचा निर्णय आहे. म्हणजे एखाद्या प्रवासाचे तिकीट सात रुपये असेल तर त्याऐवजी पाच रुपये आकारणी, तर आठ रुपये तिकीट असल्यास दहा रुपये तिकीटदर आकारला जाईल. परंतू यासंदर्भात कुठलेच पत्रक भाडेवाढीच्या दिवसापर्यंत बुलडाणा विभागाला आले नाही. प्रवाशांना दिलासाभाडेवाढीच्या दिवशीपर्यंतही भाडेवाढीचे पत्र न आल्याने जुन्याच्या दारावर तिकीट काढण्यात आले. त्यामुळे प्रवाशांची १५ जून रोजी का होईना १८  टक्के भाडेवाढीपासून सुटका झाली. पत्रक येईपर्यंत भाडेवाढीपासून प्रवाशांना दिलासा मिळत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportराज्य परीवहन महामंडळ