शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

गारपीट सर्व्हेच्या कामात दिरंगाई भोवली, तीन मंडळ अधिका-यांसह सहा तलाठ्यांना कारणेदाखवा नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 17:15 IST

खामगाव : तालुक्यात ११ व १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या गारपिटीमुळे शेतक-यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. त्या नुकसानाची पाहणी करून विहीत प्रपत्रामध्ये सर्व्हे करून तात्काळ माहिती सादर करण्यासाठी संबंधित तलाठी मंडळ अधिका-यांना जिल्हाधिका-यांनी आदेश दिले होते.

खामगाव : तालुक्यात ११ व १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या गारपिटीमुळे शेतक-यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. त्या नुकसानाची पाहणी करून विहीत प्रपत्रामध्ये सर्व्हे करून तात्काळ माहिती सादर करण्यासाठी संबंधित तलाठी मंडळ अधिका-यांना जिल्हाधिका-यांनी आदेश दिले होते. परंतु खामगाव विभागातील तीन मंडळ अधिकारी व सहा तलाठी यांनी वेळेवर गारपीटग्रस्त भागाची पाहणी करूनही सर्व्हे सादर न केल्याने त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशा प्रकारची नोटीस तहसीलदार सुनील पाटील यांनी २२ फेब्रुवारी रोजी बजावली आहे.बुलडाणा जिल्ह्यासह खामगाव विभागात ११ व १२ फेब्रुवारीला झालेल्या गारपिटीमुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले. यामध्ये गहू, हरभरा, संत्रा, कांदा यांसारखे हाती येणारे पीक उद्ध्वस्त झाले. त्यामुळे या परिसरातील शेतक-यांचा तात्काळ सर्व्हे करावा, यासाठी पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर, आ. आकाश फुंडकर यांनी या विभागाचा अधिका-यांसमवेत ताबडतोब दौराही केला आणि संबंधित अधिका-यांना आदेश दिला की, या गारपीटग्रस्त शेतक-यांचा सर्व्हे करून ताबडतोब रिपोर्ट देण्यात यावा.परंतु खामगाव विभागातील तीन मंडळ अधिकारी आणि सहा तलाठी यांनी वेळेत सर्व्हे न केल्यामुळे आणि उच्च अधिकारी यांना रिर्पोटिंग न केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये किशोर रत्नपारखी मंडळ अधिकारी काळेगाव, एन. व्ही. देशमुख मंडळ अधिकारी वझर, व्ही. पी. महाजन मंडळ अधिकारी हिवरखेड, जी. बी. मनसुटे तलाठी नांद्री, एस. पी. नगराळे तलाठी वर्णा, व्ही. जे. मगर तलाठी आवार, के. टी. इंगळे तलाठी निपाणा, कु. व्ही. जे. गवळी तलाठी बोरजवळा, आर. एस. चौधरी तलाठी काळेगाव यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करून तात्काळ समाधानकारक उत्तर न मिळाल्यास निलंबित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिका-यांकडे पाठविण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद आहे.सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांच्या मीटिंग घेऊन सर्वांना गारपीटग्रस्त भागाचा सर्व्हे करण्यासाठी निर्देशित करण्यात आले होते. परंतु काही कर्मचा-यांनी कामात दिरंगाई केल्यामुळे आणि अतिमहत्त्वाच्या संवेदनशील कामामध्ये अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे वरील कारवाई करण्यात आली आहे.- सुनील पाटील, तहसीलदार, खामगाव