शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पुरामुळे रस्ता खरडून गेला; औरंगाबाद-नागपूर महामार्गावरील वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 13:36 IST

मेहकर नजीक रस्त्याच्या दोन्ही बाजूस १० कि.मी. पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत.

बुलडाणा: सुलतानपूर ते मेहकर रोडवरील सितानाहनी नदीवरील पुलाजवळ पुरामुळे रस्ता खरडून गेला आहे. त्यामुळे औरंगाबाद-नागपूर महामार्गावरील वाहतूक शनिवारी सकाळी आठ वाजेपासून ठप्प झाली आहे. मेहकर नजीक रस्त्याच्या दोन्ही बाजूस १० कि.मी. पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत.जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून परतीचा पाऊस सुरू आहे. सर्वसाधारण पर्जन्यमानाच्या तुलनेत ११७.५३ टक्के पाऊस झाला आहे. मेहकर तालुक्यात शुक्रवारीपासून सततधार पाऊस सुरू आहे. रात्रभर पावसाने हजेरी लावल्याने अनेक नद्यांना पूर आला. सुलतानपूर ते मेहकर रोडवरील नदी सुद्धा तुडूंब भरली आहे. या पुरामुळे नदीवरील पुलानजीकचा रस्ता खरडून गेला आहे. काही दिवसांपासून सुलतानपूर ते मेहकर रस्त्याचे काम सुरू आहे. त्यात पावसाने या रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे.  पुरामुळे रस्ता खरडून गेल्याने नागपूर-औरंगाबाद या महामार्गावरील मेहकरनजीकची वाहतूक प्रभावीत झाली आहे. हा रस्ता वर्दळीचा असल्याने काही तासातच वाहनांच्या रांगा लागल्या. शनिवारी सकाळी आठ वाजेपासून वाहतूक ठप्प झाल्याने १० कि़मी. पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सध्या पावसाचा जोर कमी झालेला नाही. त्यामुळे पूर परिस्थतीचा धोका वाढतच आहे. 

पैनगंगा नदीला पूरपरिस्थितीअंत्री देशमुख नजीक पैनगंगा नदीलाही सततच्या होत असलेल्या पावसामुळे  पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतकºयांच्या शेतात पाणी घुसल्याने सोयाबीनच्या सुड्या वाहून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. आज सकाळपासून पैनगंगा नदीचा प्रवाह वाढला आहे. पुरामुळे पिकाचे नुकसान होण्यासोबतच शेतजमिनी सुद्धा खरडून गेल्या आहेत. त्यामुळे पिकांसाठी असणारा पोत पाण्यासोबत वाहून गेला आहे. हे कधीही न भरून निघणारे नुकसान आहे. त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वाढली आहे. 

कोराडी प्रकल्प ओव्हर फ्लोमेहकर तालुक्यातील कोराडी प्रकल्प १०० टक्के भरलेला आहे.  सध्या पावसाचा जोर वाढतच आहे. ओव्हर फ्लो झालेल्या कोराडी प्रकल्पाने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील शेतकºयांची धाकधुक वाढली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकरhighwayमहामार्ग