शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

खोलीकरणामुळे पुर्णा नदीपात्रात वाढला जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 14:25 IST

पुर्णा नदी पात्रात खोल खड्डा खोदण्यात आला असून त्यात जमा झालेल्या पाण्याचा उपसा करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : मलकापुर वासियांची तहान भागविण्यासाठी नगराध्यक्ष, पाणीपुरवठा सभापतींच्या प्रयत्नांना यश आले असून शहराचा पाणीपुरवठा लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. पुर्णा नदी पात्रात खोल खड्डा खोदण्यात आला असून त्यात जमा झालेल्या पाण्याचा उपसा करण्यात येत आहे.मलकापूर शहराला धुपेश्वर येथून पुर्णानदीवरुन पाणीपुरवठा केला जातो. मात्र पुणार्माय आटली असल्याने तसेच नदीपात्रात साचलेला गाळ ओला असल्याने पोकलेन, जे.सी.बी जाऊ शकत नव्हती. त्यामुळे शहरवासीयांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागला.दरम्यान नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ, उपाध्यक्ष हाजी रशिदखाँ जमादार, पाणीपुरवठा सभापती राजेंद्र वाडेकर, नगरसेवक राजु पाटील, अनिल गांधी, पाणीपुरवठा अभियंता आचार्य, अयुबभाईसह न.प.च्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी गत महिनाभरापासून पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असुन पोकलेनद्वारे नदीपात्रात १० बाय ३० आकाराचा २० फूट खोल खड्डा खोदण्यात आला. यामुळे या खड्डयात पाणी आले असून २० हॉर्सपॉवरच्या मोटारीने पाणी उपसा करण्यात येत आहे.यामुळे पंधरा दिवसांवर गेलेला मलकापूर शहराचा पाणी पुरवठा लवकरच सुरळीत होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा सभापती राजेंद्र वाडेकर व कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाMalkapurमलकापूरPurna Riverपूर्णा नदी