शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘बीजेएस’मुळे बुलडाणा जिल्ह्यातील हजारो विहिरींना फुटला पाझर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 17:55 IST

बुलडाणा : भारतीय जैन संघटनेने (बीजेएस)प्रशासनाच्या सहकार्याने उन्हाळ््यात केलेल्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ मोहिमेंतर्गत झालेल्या दर्जेदार कामामुळे जिल्ह्यातील २८० ठिकाणी लहान-मोठ्या प्रकल्पात पाणीसाठा वाढला असून हजारो विहिरींना पाझर फुटला आहे

ठळक मुद्दे‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही मोहीम भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा हे जिल्हा प्रशासनाच्या मदतीने बुलडाणा जिल्ह्यात राबवित आहेत. बीजेएस व जिल्हा प्रशासनाने १२० जेसीबी व १४ पोकलॅण्डच्या सहाय्याने ७ मार्च २०१८ रोजी जिल्ह्यात या मोहिमेला सुरूवात केली. जिल्ह्यातील धरण, गाव तलाव, नाला खोलीकरण आदी २८० पेक्षा जास्त ठिकाणी गाळ काढण्यात आला.

- हर्षनंदन वाघ

बुलडाणा : भारतीय जैन संघटनेने (बीजेएस)प्रशासनाच्या सहकार्याने उन्हाळ््यात केलेल्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ मोहिमेंतर्गत झालेल्या दर्जेदार कामामुळे जिल्ह्यातील २८० ठिकाणी लहान-मोठ्या प्रकल्पात पाणीसाठा वाढला असून हजारो विहिरींना पाझर फुटला आहे. यामुळे वर्षाेनुवर्षे गाळ साचून पाणीसाठा कमी झालेल्या प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढण्यात सुरूवात झाली असून विहिरींना पाणी आल्यामुळे जिल्ह्याची दुष्काळमुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे.दुष्काळ ही समस्या दिवसेंदिवस गंभीर रुप धारण करत आहे. दुष्काळाचा फटका सर्वाधिक शेतकरी कुटूंबाना बसत असून, राज्यात सर्वाधिक आत्महत्या असणाऱ्या जिल्ह्यामध्ये बुलडाणा जिल्ह्याचाही समावेश आहे. याच दुष्काळावर मात करण्यासाठी ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही मोहीम भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा हे जिल्हा प्रशासनाच्या मदतीने बुलडाणा जिल्ह्यात राबवित आहेत. धरणातील गाळ उपसा करून धरणाची पाणी पातळी वाढविणे आणि तोच गाळ शेतात टाकल्यानंतर शेताची सुपिकता वाढविणे या उद्देशाने बीजेएस व जिल्हा प्रशासनाने १२० जेसीबी व १४ पोकलॅण्डच्या सहाय्याने ७ मार्च २०१८ रोजी जिल्ह्यात या मोहिमेला सुरूवात केली. त्यानंतर ३० जून २०१८ पर्यंत जवळपास ३ महिन्याच्या कालावधीनंतर जिल्ह्यातील धरण, गाव तलाव, नाला खोलीकरण आदी २८० पेक्षा जास्त ठिकाणी गाळ काढण्यात आला. यावेळी परिसरातील शेतकºयांनी आपली जमीन सुपीक करण्यासाठी गाळ आपल्या शेतात टाकून या मोहिमेला प्रतिसाद दिला आहे. यावेळी काही समाजिक कार्यकर्त्यांनी अल्पभूधारक शेतकºयांना शेतात गाळ टाकण्यासाठी मोफत टॅक्टर उपलब्ध करून दिले.नाला खोलीकरणामुळे शेतीला फायदाखामगाव तालुक्यातील कदमापूर येथील अल्पभूधारक शेतकरी रविंद्र तेलगोटे यांनी पाणी साचल्यामुळे शेती चिभडत होती. त्यामुळे शेती करणे कठिण झाले होते. याबाबत प्रशासनाकडे अनेक तक्रारी केल्यानंतरही तेलगोटे यांची कोणीही दखल घेत नव्हते. शेवटी भारतीय जैन संघटनेच्या जिल्हा कार्यालयात आल्यानंतर त्यांनी आपली अटचण सांगितली. याबाबत निवासी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ या मोहिमेअंतर्गंत तेलगोठे यांच्या शेताजवळ जवळपास ३ किलो मिटर नाला खोलीकरण करण्यात आले. त्यामुळे तेलगोठे यांच्या शेतीसह परिसरातील शेतकºयांची शेतीही चिभडण्यापासून वाचली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी