शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

दुष्काळी अनुदान वितरणाचे काम संथगतीने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 3:01 PM

वाटप प्रक्रीयेत गती नसल्याने शेतकºयांना अनुदानाची प्रतीक्षा आहे.

- देवेंद्र ठाकरे लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: गत पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीची घोषणा झाली. परंतु अद्यापही हजारो शेतकरी शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली नसल्याचे दिसून येते. वाटप प्रक्रीयेत गती नसल्याने शेतकºयांना अनुदानाची प्रतीक्षा आहे.गत चार वर्षांपासून शेतकºयांना सतत कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागले. त्यामुळे शेतकºयांची परिस्थिती दयनिय आहे. त्यातच गत पावसाळ्यात परतीच्या पावसामुळे पुन्हा भर पडली. शेतकºयांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला. नुकसानाचे प्रमाण प्रचंड असल्याने शासकीय स्तरावर वेगाने सुत्रे हलली.नुकसानाचे पंचनामे झाले, अहवालही सादर झाला आणि मदत जाहीर झाली. हेक्टरी ८ हजार रूपये याप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मदत जाही करण्यात आली. यातील पहिल्या टप्प्यातील मदतीचे वितरण झाले. दुसºया टप्प्यातील मदत वितरीत करणे सुरू आहे. परंतु या कामातील गती वाढताना दिसून येत नाही. बँकांमध्ये पैसे जमा करण्यात आले, असे महसूल विभागाकडून सांगण्यात येते. परंतु शेतकºयांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. दुसºया टप्प्यातील मदतीचेच वाटप पुर्ण झाले नसताना आणखी तिसरा टप्पा आणि त्याचे वितरण यात आणखी बराच काळ निघून जाणार असल्याचे दिसते. परिणामी शेतकºयांच्या संकटाच्या काळात मदत वेळेवर मिळत नसल्याची परिस्थिती आहे.दरम्यान गतवर्षी पावसाअभावी खरीप तसेच रब्बीचा हंगामही हातून गेला. त्यामुळे उत्पादन झाले नाही. परिणामी शासनाने दुष्काळी मदत जाहीर केली. परंतु ती मदतही अद्यापही शेकडो शेतकºयांच्या खात्यात जमा झाली नसल्याची परिस्थिती आहे. पिक विम्याचेही तेच झाले. अनेक शेतकºयांना पिक विम्याचा लाभ मिळाला नाही. काही शेतकºयांच्या खात्यात जमा झालेली रक्कम तर हास्यास्पद आहे. दुष्काळ निधी, पिक विम्यानंतर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचेही तेच होत आहे.योजनेसाठी पात्र शेतकºयांच्या खात्यात वर्षभरात ६ हजार रूपये या योजनेद्वारे जमा करण्यात येणार आहेत. परंतु वस्तुस्थिती गंभीर आहे. काही शेतकºयांच्या खात्यात आतापर्यंत ४ हजार रूपये, काहींच्या खात्यात केवळ २ हजार रूपये तर काही शेतकºयांच्या खात्यात एकही रूपया अद्याप जमा करण्यात आला नाही.एकीकडे शेतकºयांच्या खात्यात मदत जमा करण्याची ही परिस्थिती असताना, आता सध्याच्या ओल्या दुष्काळाची मदतही संथगतीने वाटप करण्यात येत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावFarmerशेतकरी