शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
4
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
5
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
6
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
7
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
9
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
10
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
11
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
12
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
13
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
14
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
15
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
16
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
17
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
18
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
19
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
20
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार

बुलडाणा जिल्ह्यातील तणावग्रस्त शेतकर्‍यांना दुग्ध व्यवसायाचा आधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 01:55 IST

सातत्याने निर्माण होणारी अवर्षणसदृश स्थिती, बदलते हवामान,  यामुळे कृषी जगतासमोर मोठय़ा समस्या उभ्या ठाकल्या आहेत. अशा स्थितीत  शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत असून, असंख्य शेतकरी तणावात आले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ३0१ लाभार्थी शेतकर्‍यांना दिले ६२ लाखांचे अनुदान

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सातत्याने निर्माण होणारी अवर्षणसदृश स्थिती, बदलते हवामान,  यामुळे कृषी जगतासमोर मोठय़ा समस्या उभ्या ठाकल्या आहेत. अशा स्थितीत  शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत असून, असंख्य शेतकरी तणावात आले आहेत. अशा शेतकर्‍यांना शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून अर्थार्जनासाठी हा तभार लागावा, यासाठी दुग्धोत्पादनाला शासनातर्फे चालना दिली जात असून,  पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जिल्ह्यातील ३0१ लाभार्थी शेतकर्‍यांना दुधाळ  जनावरे घेण्यासाठी ६२  लाख ११ हजार ६२४ रुपये निधी देण्यात आला  आहे. त्यामुळे तणावग्रस्त शेतकर्‍यांच्या परिस्थितीत सुधारणा होत आहे.निसर्गातील अनियमिततेचा शेती व्यवसायाला मोठा फटका बसून उत्पादनात  घट होत आहे. त्यात बाजारपेठेत शेतमालास भाव मिळत नसल्यामुळे शे तकर्‍यांवरील कर्ज वाढून त्यांच्या आत्महत्याही दिवसेंदिवस वाढत आहे.  त्यामुळे अशा तणावग्रस्त शेतकर्‍यांना आधार मिळावा, शेतकरी आत्महत्येचे  प्रमाण कमी व्हावे, यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे त. अशा उपक्रमापैकी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे तणावग्रस्त शे तकर्‍यांना दुधाळ जनावरांसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. जिल्हा  परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे  विशेष घटक योजना व ओटीएसपी योजनां तर्गत ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे, शेळीचे वाटप करण्यात आले.  यावर्षी २0१६-१७ या आर्थिक वर्षात ३१६ लाभार्थींना दुधाळ जनावरे, २७८  लाभार्थींना शेळीसाठी अनुदान देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी  १५८ लाभार्थींना दुधाळ जनावरांसाठी प्रत्येकी ६३ हजार ७९६ रुपयांप्रमाणे १0  लाख ७९ हजार ७६८ रुपये अनुदान, तसेच १४३ लाभार्थींना शेळ्यांसाठी प्र त्येकी ३५ हजार ८८६ रुपयेप्रमाणे ५१ लाख ३२ हजार ६९८ रुपये अनुदान  देण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील काही तणावग्रस्त शेतकर्‍यांना दुग्ध  व्यवसायाचा आधार मिळाला असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत  आहेत.

आर्थिकदृष्ट्या परवडणारा व्यवसायशेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत  आलेला महत्त्वाचा व्यवसाय असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडणारा आहे.  आहारामध्ये प्रत्येकाला प्रतिदिनी ३00 मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या  लोकसंख्येसाठी दुधाचे उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. आपल्याकडे गाईपासून  ४५ टक्के तर म्हशीकडून ५२ टक्के दूध मिळते; पण यात सध्या उलटे चित्र आहे.  दुधामध्ये पाणी, कबरेदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात  असल्याने दूध हे पूर्णान्न आहे. गाईच्या एक लीटर दुधातून ६00 किलो  कॅलरीज, तर म्हशींच्या एक लीटर दुधापासून १000 किलो कॅलरीज मिळता त.

टॅग्स :Farmerशेतकरी