शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चिखली, मेहकर तालुक्यातही ठिबक सिंचन घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 14:22 IST

यासंदर्भात तक्रार प्राप्त झाली असून तक्रारीच्या अनुषंगाने निश्चितच चौकशी करण्यात येईल, असे ही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: संपुर्ण जिल्ह्यात गाजत असलेल्या ठिबक सिंचन घोटाळ्यात पाच दिवस उलटले तरी अद्याप कृषी विभागाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही होवू शकली नाही. दरम्यान जिल्हयातील घाटावरील भागात चिखली, मेहकर व बुलडाणा तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी सुद्धा ठिबक सिंचनचे बोगस अनुदान लाटल्याचे दिसून येते. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी या सर्व प्रकाराची दखल घेण्याची गरज आहे.‘लोकमत’ने पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील घोटाळा उघड केल्यानंतर जिल्ह्यातील अनेक गावात झालेला गैरप्रकार समोर येत आहे. आधी घाटाखालील सहाही तालुक्यात ठिबक सिंचन घोटाळा उघड झाल्यानंतर एकेका गावातील गैरप्रकार समोर येत आहे. यामध्ये बुलडाणा, चिखलीमेहकर या तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या तालुक्यातील शेतकºयाना ठिबकचे अनुदान मिळवून देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी कृषी सहाय्यकांंना हाताशी धरून गैरप्रकार केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. दरम्यान, यासंदर्भात तक्रार प्राप्त झाली असून तक्रारीच्या अनुषंगाने निश्चितच चौकशी करण्यात येईल, असे ही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कृषी सहाय्यकांना हाताशी धरून येथे झाला घोळबुलडाणा तालुक्यातील अजीसपूर, अंत्रीतेली, भडेगाव, भादोला, बोडेगाव, चांडोल, बारेखेड, दहिद बु. दहिद खुर्द, दालसावंगी, दिपूर, देऊळघाट, धाड, धामणगाव, गिर्डा, जांब, गुमणी, जांभरूण, नांद्राकोळी, रुईखेड, साखळी बु, सातगाव, सिंदखेड, शिरपूर या गावामध्ये अनेक शेतकºयांनी खोटी माहिती सादर करून शासनाची दिशाभूल करीत अनुदान लाटले आहे.४प्रतिष्ठीत लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली, मेहकर तालुक्यातील अंजनी बु, अंत्री देशमुख, आलेगाव, भालेगाव, भोसा, बोरी, गाजरखेड, गवंढाळा, घोसर, जानेफळ, सुकळी, मेहकर, सुर्यापूर, उटी, वरवंड या गावातील अनेक शेतकºयांनी खोटी कागदपत्रे सादर करीत योजनेचा लाभ घेतला.४चिखली तालुक्यातील अमडापूर, अंचरवाडी, अंत्री कोळी, बाभूळगाव, बेरला, भालगाव, बानखेड, चंढाई, दसाळा, दहिगाव, डोंगर शेवळी, खोर, किन्ही नाईक, कुसुंबा, मालगी, सावरगाव डुकरे, सातगाव भुसारी, उंद्री, वैरागड व वरखेड या गावामधील काही शेतकºयांनी सुद्धा आॅफलाईनमध्ये लाभ घेतला असताना व तिन वर्षे झाली नसताना परत योजनेचा अनुदान लाटल्याचा प्रकार घडला आहे.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात तक्रार प्राप्त झाली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने निश्चित चौकशी करण्यात येईल.- नरेंद्र नाईक, जिल्हा अधिक्षककृषी अधिकारी, बुलडाणा.

 

टॅग्स :khamgaonखामगावChikhliचिखलीMehkarमेहकर