शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

मोताळा तालुक्यात ठिबक सिंचन क्षेत्र वाढले!

By admin | Updated: March 14, 2016 01:50 IST

शेती सिंचनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; पाण्याच्या बचतीसह उत्पन्नात होतेय वाढ.

मोताळा (जि. बुलडाणा): अत्यल्प पर्जन्यामुळे तालुक्यातील पाण्याची उपलब्धता कमी झालेली आहे. त्या पाण्यात अधिक क्षेत्र सिंचित करण्यासाठी व उत्पादनवाढीसाठी शेतकरी अलीकडे मोठय़ा प्रमाणात तुषार व सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करत असून, मोताळा तालुक्यात ९ हजार २३ हेक्टरवरील शेतकरी या तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. यामुळे उत्पादन वाढीसोबत आता पाण्याचीही बचत होत आहे.मोताळा तालुक्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपूर्वीपर्यंत परंपरागत पद्धतीने सिंचन करून धरण, प्रकल्प, विहिरीतील पाणी थेट पाटाद्वारे पिकापर्यंत पोहोचवित होते. यामुळे पाण्याचा मोठय़ा प्रमाणात अपव्यय होत होता. मात्र, मागील काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने वर्षभर सिंचन करणे शेतकर्‍यांना कठीण होऊन बसले. परिणामी सततच्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्याने तालुक्यातील विहिरी जानेवारीतच तळ गाठतात. मात्र, आता शेतकरी तुषार व ठिबक सिंचन या आधुनिक पद्धतीचा अवलंब करीत असल्याने वर्षभर सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे. या तंत्रज्ञानामुळे शेतकर्‍यांना वर्षभर पाण्याची उपलब्धता होत असल्याने तालुक्यातील शेकडो हेक्टर जमीन आता ठिबक सिंचनाच्या खाली आली आहे. ठिबक सिंचन अतिशय फायदेशीर ठरू लागल्याने सन २0१५-१६ पर्यंत सद्यस्थितीत तालुक्यातील ठिबक, तुषार, स्प्रिंकलरचे एकूण क्षेत्र ९0२३ हेक्टरपर्यंत गेले आहे. तालुक्यात कृषी क्षेत्र हे ७९ हजार ७२८ हेक्टर असून, यातील खरिपाचे ५३ हजार ५९४ हेक्टर तर रब्बीचे ८ हजार ५२२.४0 हेक्टर आहे. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ६८८.६ मि.मी. आहे. ठिबक, स्प्रिंकलर व तुषारच्या माध्यमातून गहू, मका, हरभरा, भाजीपाला, कापूस, कांदा, पपई, मिरची, टमाटे अशी पिके जेमतेम पाण्याच्या आधारावर घेत आहेत. ठिबक सिंचनासाठी अनेक शेतकर्‍यांनी कृ षी विभागाच्या अनुदान योजनेचाही लाभ घेतला तर अनेकांनी स्वबळावर ठिबक, स्प्रिंकलर, तुषार प्रणाली राबवल्याने सद्यस्थितीत तालुक्यातील क्षेत्र ९ हजार हेक्टरच्या पुढे गेले आहे. शेतकरी अल्प पाण्यात शेती करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करीत आहे. परंतु तालुका कृषी विभागाकडून शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात येत नाही. अनेक शेतकरी नापिकीमुळे आत्महत्या करीत आहेत. अशा शेतकर्‍यांना सिंचन विहिरी देताना ठिबक सिंचनाचे महत्त्व समजावून सांगणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांना अपेक्षित माहिती मिळत नसल्याने अनेक जण या योजनांपासून वंचित राहत आहेत.