शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

दसरखेड येथील पिण्याच्या पाण्याची टाकी कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 20:44 IST

दसरखेड येथील पिण्याच्या पाण्याची टाकी कोसळली

मलकापूर: दसरखेड गावाला पाणीपुरवठा करणारी पाणीपुरवठा योजनेची पाण्याची टाकी अचानक कोसळल्याची घटना आज सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली असून गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठ्या संख्येने गर्दी केली.         राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 मुक्ताई नगर रोडवर मौजे दसरखेड हे गाव असून या गावाची लोकसंख्या सुमारे 1 हजार 600 आहे. या गावाला पिण्याचे पाणी पुरवठा करणारी पाणी पुरवठा योजनेची पाण्याची टाकी पशुवैद्यकीय दवाखाना परिसरात जवळपास ४ते५ वर्षाआधी निर्मिती करण्यात आलेली होती.ही पाण्याची टाकी आज सायंकाळी अचानक कोसळली. सुदैवाने या घटनेत कसलीही जीवित हानी झाली नाही. परंतु या टाकीच्या बाजूला मौजे दसरखेडला वीज पुरवठा करणारी डीपी होती. या डीपी वरून मुख्य लाईन ही दसरखेड गावात जात होती या डीपीवर जर ही पाण्याची टाकी कोसळली असती तर निश्चितच येथे भयावह परिस्थिती निर्माण झाली असती असेच चित्र घटनास्थळी दिसून आले.मात्र सुदैवाने ती टाकी बाजूला पडल्याने कुणालाही क्षती पोहचली नाही. परंतु ही टाकी पडलीच कशी?असा प्रश्न गावकऱ्यांना पडला असून त्यामुळे गावकऱ्यांनी घटनास्थळी रोष व्यक्त करीत निकृष्ट दर्जाचे बांधकाम असल्यानेच टाकी पडली असा आरोप करीत आता आम्हाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार तरी कसा? असा प्रश्न प्रत्येकाकडून उपस्थित होताना दिसून आला. घटना कळताच शिवसेना तालुकाप्रमुख विजय साठे, सरपंच संतोष साठे सह ग्रामस्थांनी तात्काळ घटना स्थळाकडे धाव घेतली. घटनास्थळी स्थानीकांनी मोठया प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले.           पाण्याची टाकी पडल्याचे कळताच आम्ही घटना स्थळाकडे धाव घेतली गावकऱ्यांना शांतही केले. महत्त्वाचे म्हणजे ही पाण्याची टाकी अद्याप पावेतो दसरखेड ग्रामपंचायतीला हस्तांतरित करण्यात आली नव्हती.- संतोष साठे सरपंच दसरखेड
टॅग्स :Malkapurमलकापूरbuldhanaबुलडाणा