बुलडाणा : जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक ही पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेतली जाते. मात्र बुलडाण्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बुलडाण्याकडे पाठ फिरविल्यामुळे या बैठकीचे तीनवेळा आयोजन करुन ती रद्द करण्यात आली, अखेर येत्या ३ जुलै रोजी ही बैठक होणार आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शाई फेकल्याच्या प्रकरणानंतर यांनी बुलडाण्यात येणे टाळले आहे. गारपीटग्रस्तांच्या दौर्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सोबतही ते आले नाही, तसेच लोकसभेच्या प्रचारादरम्यानही फिरकले नाही. खरिपाची बैठक सुद्धा मुंबईत उरकून घेत त्यांनी बुलडाणा येणे टाळले. दरम्यानच्या काळात बुलडाण्याचे पालकमंत्री बदलण्याची चर्चा राजकीय वतरुळात सुरू होती. मात्र, लोकसभेतील काँग्रेसच्या पराभवानंतर त्या चर्चेलाही पूर्णविराम मिळाला आहे. या पृष्ठभूमिवर जिल्हा नियोजन समितीची बैठक आता ३ जुलैचा मुहूर्त ठरला आहे.
डीपीडीसीला मिळाला मुहूर्त
By admin | Updated: June 26, 2014 02:04 IST