शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

 बाहुलीचे पोस्टमार्टेम प्रकरण : संशयास्पद माहिती देणे गावकऱ्यांच्या अंगलट येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 6:34 PM

संशयास्पद माहिती देणेही गावकऱ्यांच्या अंगलट येणार असल्याचे संकेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  तालुक्यातील बोरजवळा येथील   बाहुलीचे पोस्टमार्टेम प्रकरण पिंपळगाव राजा पोलिसांच्या अंगलट आले. त्यानंतर धडा घेतलेल्या पोलिसांनी आता गावकऱ्यांच्या दिशेने अंगुलीनिर्देश केला आहे.  त्याचवेळी संशयास्पद माहिती देणेही गावकऱ्यांच्या अंगलट येणार असल्याचे संकेत आहेत.पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या बोरजवळा येथील तलावाच्या काठावर गुरूवारी रात्री साडे नऊ वाजता दरम्यान, कथित अर्भक सापडल्याची वार्ता पसरली. पोलिसांनी तात्काळ दखल घेत, स्थानिकांच्या मदतीने तलावाच्या काठावरील  पाण्यातून कथित अर्भक बाहेर काढले.  पंचनामा केल्यानंतर याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली. त्यानंतर खामगाव येथील सामान्य रूग्णालयात कथित अर्भकाला  पोस्टमार्टेमसाठी नेण्यात आले. पोस्टमार्टेम दरम्यान, कथित अर्भक बाहुली असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. पोलिसांच्या पंचनाम्यावर अंगुलीनिर्देश होत असल्याने, हा प्रकार पोलिसांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे हा प्रकार कुणी केला; संयशास्पद संदेश कुणी पोहोचविला? कोरोना आपातकालिन परिस्थितीत पोलिसांची दिशाभूल कुणी केली? याचा शोध घेण्यात येत असल्याचे समजते. त्यामुळे ‘त्या’ बाहुलीचे ‘भूत’ आता गावकरांच्या मानगुटीवर असल्याची चर्चा परिसरात होत आहे.

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी