शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांचा संप :IMAने पाळला काळा दिवस, काळ्या फिती लावून निषेध करत एसडीओंना दिलं निवेदन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 13:51 IST

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या विरोधात 2 जानेवारीला खामगाव, नांदुरा व जळगाव जामोद तालुक्यात आयएमएने बंद पाळला आहे.

खामगाव (बुलडाणा) : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या विरोधात 2 जानेवारीला खामगाव, नांदुरा व जळगाव जामोद तालुक्यात आयएमएने बंद पाळला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामावर बहिष्कार टाकत शासनाच्या या धोरणाचा डॉक्टरांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला.  राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे विधेयक संसदेत पारित होत आहे. वर्तमान स्थितीतील विधेयकाला आयएमएने विरोध दर्शवला आहे. देशभर पुकारण्यात आलेल्या या आंदोलनात खामगाव आयएमए विभागसुद्धा सहभागी झाला आहे. 

विभागातील १३८ डॉक्टर्स या आंदोलनात सहभागी झाले. सकाळपासूनच डॉक्टरांनी बंद पुकारल्याने ओपीडीवर परिणाम झाला. मात्र अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आल्या होत्या. आयएमए अध्यक्ष डॉ. निलेश टापरे यांच्या नेतृत्वात मंगळवारी दुपारी १२ वाजता उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सचिव डॉ. गुरुप्रसाद थेटे, डॉ. विनोद राजनकर, डॉ. बावस्कर, डॉ. गायकवाड आदींची उपस्थिती होती. 

का आहे विधेयकाला विरोध ?१. हे विधेयक खासगी व्यवस्थापनाच्या सोईचे आहे. ज्यामुळे भ्रष्टाचार वाढेल.२. वैद्यकीय महाविद्यालयाच्या फीवर ४० टक्क्यांपर्यंत जागावर शासनाचा निर्बंध राहील. ६० टक्के जागांबद्दल व्यवस्थापनाला अधिकार राहील. फी भरमसाठ वाढवण्यात येईल. ३. दंडाद्वारे आकारण्यात येणारी रक्कम ५ कोटी १०० कोटी राहू शकते. ज्यामुळे भ्रष्टाचाराला वाव आहे. ४. आयोगात फक्त ५ राज्यांचे प्रतिनिधित्व राहील. उर्वरीत २५ राज्ये दुर्लक्षित राहतील.

टॅग्स :doctorडॉक्टर