शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांच्या दिमतीला ‘दिवाळी जादा’ नावाची लालपरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 18:14 IST

बुलडाणा: दिवाळी उत्सवानिमित्त एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सुविधेसाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यात दिवसाकाठी ३ हजार ७३३ किलोमिटरचे नियोजन करण्यात आले आहे.

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा: दिवाळी उत्सवानिमित्त एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सुविधेसाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यात दिवसाकाठी ३ हजार ७३३ किलोमिटरचे नियोजन करण्यात आले आहे.  या जादा बसेसवर ‘दिवाळी जादा’ असा उल्लेख राहणार आहे. दिवाळीत प्रवाशांची वाढती गर्दी व एसटी महामंडळाला मिळणारे उत्पन्न पाहता यावर्षी १ ते २० नोव्हेंबरपर्यंत ‘दिवाळी जादा’ नावाच्या लालपरीची सुविधा एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे. दिवाळी उत्सव  ५ नोव्हेंबरपासून चालू होणार असल्याने गावी जाण्यासाठी आतापासूनच  एसटी महामंडळाने बसफेºयांचे नियोजन केले आहे.  यामध्ये एका दिवशी १९ शेड्युल व ३ हजार ७३३ किलोमिटरचे नियोजन राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागाकडून करण्यात आले आहे. दिपावली सणानिमित्त व सलग सार्वजनिक सुट्टया येत असल्याने प्रवाशी गर्दीत वाढ होते. त्यामुळे मध्वर्ती कार्यालयाने दिलेल्या व नियंत्रण समितीने दिलेल्या जादा फेºया सुरू करण्यात येणार आहे. विविध मार्गांवर नियमितपणे बससेवा सुरू करण्याऐवजी कोणत्या मार्गांवर कोणत्या दिवशी प्रवाशांची गर्दी होते, याबाबत यापूर्वीचा अनुभव विचारात घेऊन पूर्वनियोजित जादा वाहतूकीचे नियोजन करून जादा वाहतूक करण्यात येत आहे. जादा वाहतूकीमुळे ऐनवेळी स्थानकावर होणाºया प्रवाशी गर्दीचा निपटारा करण्याच्या दृष्टीने वाहतूकीमधील लवचिकता राखणे शक्य होते. १ नोव्हेंबरपासून जादा वाहतूक सुरू करण्यात येत आहे. ह्या जादा फेºया २० दिवस चालणार आहेत. जादा बसेसवर ‘दिवाळी जादा’ असा उल्लेख करण्यात येणार आहे. बाहेरगावी कामानिमित्त राहत असलेल्यांना या जादा गाड्यांचा लाभ होणार आहे. 

 

दिवाळीसाठी जादा वाहतूकीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये बुलडाणा  विभागातून दिवसाला १९ शेड्यूल लावण्यात आलेले असून ३ हजार ७३३ अंतराचे नियोजन आहे. - ऐ. यू. कच्छवे, विभागीय वाहतूक अधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportराज्य परीवहन महामंडळ