शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

सत्तांतरानंतरही जिल्हानिहाय बैठकांचे सत्र सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 16:37 IST

११ जिल्ह्यांचा १६ ते २१ डिसेंबर दरम्यान सविस्तर आढावा जिल्हानिहाय स्वतंत्र बैठका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: युती शासनाच्या काळातील विकास कामांना स्थगिती दिल्याची चर्चा व टिका सध्या राज्यात अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीचे सरकारवर होत असली तरी विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या आढावा बैठका हिवाळी अधिवेशनादरम्यान घेण्याचा पायंडा वर्तमान महाविकास आघाडी सरकारने कायम ठेवल्याचे समोर येत आहे. या ११ जिल्ह्यांचा १६ ते २१ डिसेंबर दरम्यान सविस्तर आढावा जिल्हानिहाय स्वतंत्र बैठका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.अमरावती जिल्ह्याच्या बैठकीपासून यास १६ डिसेंबर रोजी सुरूवात होणार असून २१ डिसेंबर रोजी नागपूर जिल्ह्याची आढावा बैठक सर्वात शेवटी घेण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. बुलडाणा जिल्ह्याची बैठक ही २० डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. त्यासंदर्भाने जिल्हा प्रशासन सध्या कामास लागले असून एकूण दहा मुद्द्यांवर आधारीत ही बैठक राहणार आहे. यात प्रामुख्याने अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान व केलेल्या उपाययोजना, जलसंधारणाच्या कामांची प्रगती, जिल्हा परिषदांच्या अखत्यारीतील रस्त्यांची स्थिती, दुरुस्ती, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनांच्या कामांची सध्यस्थिती, जिल्ह्यातील अपूर्ण जल सिंचन प्रकल्पांचा आढावा आणि पूनर्वसनाच्या कामाची स्थिती, कृषी पंपांसाठी पुरेसा वीज पुरवठा उपलब्ध करून देणे, प्रलंबीत वीज जोडण्या, प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत बाधण्यात येणारी घरे-उदिष्ट व साध्य, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (ग्रामीण) योजनेचा आढावा, हागणदरीमुक्त गावे त्याचे उदिष्ठ, साध्य आणि करण्यात येणारी कार्यवाही, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा योजनेच्या अमंलबजावणीचा आढावा, पोलिस गृह निर्माण योजनांचा आढावा, मुख्यमंत्री पेयजल योजनेचा आढावा यात प्रामुख्याने घेण्यात येणार आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नागपुर विधानभवनातील मंत्रीमंडळ सभागृहात या बैठका होणार आहेत. भाजप-शिवसेना सत्ते असतांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१५ मधील हिवाळी अधिवेशनापासून विदर्भातील ११ ही जिल्ह्यांच्या आढावा बैठकांचा पायंडा पाडला होता. त्यात प्रामुख्याने जलयुक्त शिवार, बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्प, प्रलंबीत सिंचन प्रकल्प आणि पूनर्वसनाची कामे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, ई-म्युटेशन, स्वच्छता अभियान यासह अन्य काही योजनांच्या एकंदर स्थितीचा आढावा घेण्यात येत होता. त्यादृष्टीने सध्याच्या महाविकास आघाडी सरकरानेही हिवाळी अधिवेशनादरम्यान पूर्वीप्रमाणेच बैठका घेण्याचा पायंडा कायम ठेवला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाUddhav Thackerayउद्धव ठाकरे