शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तुरीसाठी जिल्हाभर आंदोलन पेटणार!

By admin | Updated: June 29, 2017 00:05 IST

शेतकरी, सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत तीव्र आंदोलनाचा एकमुखी निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : बाजार समितीकडे नोंदणी झालेली तूर खरेदी अद्याप बाकी असल्याने तातडीने शासकीय तूर खरेदी सुरू करण्यात यावी व नोंदणी झालेल्या तुरीच्या खरेदीची हमी देण्यात यावी, या मागणीसाठी चिखलीत शेतकरी आक्रमक झाले आहेत. यानुषंगाने बाजार समितीत २८ जून रोजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली व सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत तीव्र आंदोलनाची मोट बांधण्यात आली आहे. या बैठकीपश्चात चिखली तहसीलदार व सहायक निबंधकांना निवेदन देऊन तातडीने तूर खरेदी व चुकारे देण्याची मागणी करण्यात आली आहे.शासकीय आधारभूत हमीभाव दराने विक्रीसाठी शेतकऱ्यांनी चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीकडे आपल्याकडील तुरीची नोंदणी केलेली असताना, तूर खरेदी बंद करण्यात आल्याने तुरीची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची बैठक बाजार समितीच्या शेतकरी भवनमध्ये आ.राहुल बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मोठ्या संख्येने तूर उत्पादक शेतकरी उपस्थित होते. यावेळी बोलताना आ.राहुल बोंद्रे म्हणाले, की मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या घरातील तुरीचा शेवटचा दाणा खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र, त्यांनी दिलेला शब्द न पाळता ३१ मे ही शेवटची तारीख धरून तूर खरेदी बंद केलेली आहे, तर स्थानिक भाजपा नेते शेतकऱ्यांकडे तूर शिल्लकच नसल्याने खरेदी कशाची करायची, असा कांगावा करीत आहेत. वस्तुत: आजरोजी बाजार समितीकडे नोंदणी झालेल्या सुमारे ७० हजार क्विंटल तुरीचे मोजमाप बाकी असल्याने शेतकऱ्यांनी पक्षीय भेदाभेद बाजूला सारून पुणतांबा येथील शेतकरी ज्याप्रमाणे संघटित होऊन कर्जमुक्तीसाठी लढले, त्याच धर्तीवर तालुक्यातील शेतकऱ्यांनी संघटित होऊन वणवा पेटविणे गरजेचे असल्याचे मत आ.बोंद्रे यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान, या बैठकीत बाजार समितीकडे नोंदणी झालेल्या तुरीची तातडीने खरेदी करण्यात यावी व खरेदी झालेल्या तुरीचे चुकारे मिळावेत, यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा एकमुखी निर्धार करण्यात आला. यावेळी माजी जि.प.उपाध्यक्ष पांडुरंग पाटील खेडेकर, शिवसेनेचे नीलेश अंजनकर, काँग्रेसचे विष्णू पाटील कुळसुंदर, राकाँचे संजय गाडेकर, स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांनीसुद्धा सरकारच्या दुटप्पी धोरणावर टीका करून आंदोलनाचे समर्थन केले. प्रास्ताविकात बैठकीचे आयोजक बाजार समितीचे सभापती डॉ.सत्येंद्र भुसारी यांनी बैठकीची भूमिका विशद केली. या बैठकीला दासा पाटील कणखर, गजानन वायाळ, संजय पांढरे, अशोकराव पडघान, भगवानराव मोरे, एकनाथराव थुट्टे, कपिल खेडेकर, सुधाकरराव धमक, शिवनारायण म्हस्के, राजीव जावळे, विजय शेजोळ, अशोक मगर, ईश्वर इंगळे, ज्ञानेश्वर सुरूशे, जगन्नाथ पाटील, नितीन राजपूत, भगवानराव काळे, दिलीप पाटील, प्रल्हाद इंगळे, सिद्धेश्वर परिहार, सत्तार पटेल, डॉ.इसरार, डॉ.विकास मिसाळ, प्रमोद पाटील, विनोद खरपास, श्रीकिसन धोंडगे, लक्ष्मणराव अंभोरे, साहेबराव अंभोरे, तानाजी चिकने, प्रशांत ढोरे आदींसह तूर उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन सुधीर पडघान, तर आभार रूपराव पाटील यांनी मानले. तहसीलदारांना निवेदनचिखली कृषी उत्पन्न बाजार समितीने नोंदणी केलेल्या सुमारे ५ हजार शेतकऱ्यांकडील ७० हजार क्विंटल तूर अद्यापही मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, खरेदी बंद असल्याने हे शेतकरी अडचणी सापडले असून, बाजारात तुरीचे भाव आणखी खाली आले आहेत. त्यानुषंगाने बाजार समितीमध्ये तूर उत्पादक शेतकरी व सर्वपक्षीय नेत्यांची बैठक डॉ.सत्येंद्र भुसारी यांनी आयोजित केली होती. या बैठकीत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्यानंतर मोठ्या संख्येने उपस्थित शेतकऱ्यांनी आ. बोंद्रे व सर्वपक्षीय नेत्यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालय व सहायक निबंधक कार्यालयावर धडक देऊन निवेदन दिले. दरम्यान, बाजार समितीकडे नोंदणी झालेल्या तुरीचे मोजमाप होण्यासाठी सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे पाठविला असून, त्याबाबत पाठपुरावादेखील सुरू असल्याचे तहसीलदार मनीष गायकवाड यांनी यावेळी सांगितले.