खामगाव : महाराष्ट्राचा मानबिंदू लोकमत तर्फे आयोजित स्पोर्ट्स बुक स्पध्रेतील विजेत्यांना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक नगर पालिका शाळा क्र.६ मध्ये नुकतेच बक्षीसांचे वितरण करण्यात आले. लोकमतच्या वतीने गेल्यावर्षी क्रिडाजगताशी निगडीत आगळी वेगळी स्पर्धा इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांंकरिता आयोजीत केली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना शनिवारी बक्षीसांचे वितरण करण्यात आले. या स्पर्धेत स्नेहा निलेश देवगिरीकर वर्ग ३ रा (ड) या विद्यार्थिनीला प्रथम बक्षीस पियानो, द्वितीय बक्षीस ट्रॉली बॅग नेहा सुरेश वाघमारे हिला तर तृतीय बक्षीस रेणुका सुभाष खराते यांना देण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्रीराम घोपे, शिक्षक मामनकर, केवट, उबरहंडे, सौ.शिंगणे, राठोड उपस्थित होते. संचालन आनंद देवकते यांनी तर आभार प्रदर्शन सुनिल खरात यांनी केले. यावेळी शाळेतील शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
विजेत्यांना बक्षीसांचे वितरण
By admin | Updated: July 7, 2014 22:38 IST