मागील वर्षी कोरोनाचा प्रकोप असताना संस्थानच्यावतीने शहरात जंतुनाशक फवारणीकरिता नगरपालिका प्रशासनाला ८८ हजार ५०० रुपयांची मदत करण्यात आली होती. ग्रामीण रुग्णांनासुद्धा २१ हजारांची मदत देण्यात आली होती. यावर्षीसुद्धा कोरोना संक्रमित झालेल्या कुटुंबीयांच्या घरी मोफत सकाळ-संध्याकाळ जेवणाचे डबे संस्थांच्या वतीने पोहचविण्यात आले असून अद्यापही हा उपक्रम सुरू आहे. मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा, हे गृहीत धरून संस्थानने आपले कार्य सुरू ठेवलेले आहे. याच अनुषंगाने श्री शारंगधर बालाजी संस्थानचे सचिव दीपक पांडे, विश्वस्त उमेश मुंदडा, ॲड. संजय सदावर्ते, व्यवस्थापक हनुमंत देशमुख, कर्मचारी विनायक बदामे, गोपाल जाधव, दिनेश देशपांडे, राम आमले, संतोष जाधव, बंडू विटकरे, पवन शिंडोले यांच्यासह सेवेकऱ्यांनी जानेफळ रस्त्यावरील महावितरण कार्यालयासमोर पालांमध्ये राहणाऱ्या गोरगरिबांना कोरोना नियमांचे पालन करून विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
शारंगधर बालाजी संस्थानच्या वतीने गोरगरिबांना अन्नधान्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:57 IST