शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

अजिंठा-बुलडाणा महामार्ग बांधकामात पैनगंगेचे खोलीकरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:41 IST

बुलडाणा : अजिंठा-बुलडाणा-खामगाव या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामादरम्यान पैनगंगा नदीच्या खोलीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी मार्गी लावला आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी लागणारे गौण खनिज पैनगंगा नदी व इतर लगतच्या गाव तलावातून उपलब्ध करून घेण्यात येणार असून, त्या माध्यमातून पैनगंगा नदीचे पुनर्जीवन होणार आहे.

ठळक मुद्देहर्षवर्धन सपकाळ यांच्या जलस्रोत बळकटीकरणाचा प्रकल्प मार्गस्थटंचाईग्रस्त गावांना होईल फायदा!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : अजिंठा-बुलडाणा-खामगाव या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामादरम्यान पैनगंगा नदीच्या खोलीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी मार्गी लावला आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी लागणारे गौण खनिज पैनगंगा नदी व इतर लगतच्या गाव तलावातून उपलब्ध करून घेण्यात येणार असून, त्या माध्यमातून पैनगंगा नदीचे पुनर्जीवन होणार आहे.केंद्र शासनाने अजिंठा-बुलडाणा-खामगाव या मार्गास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला असून, रस्त्याच्या निर्मितीचे काम सुरू झाले आहे. त्यापैकी अजिंठा ते बुलडाणा या ४९ किमी मार्गापैकी अंदाजे २६ किमी लांबीपर्यंत समांतरपणे पैनगंगा नदीचा प्रवाह आहे.  सुमारे ३१ किमीपर्यंतचे पैनगंगा नदीचे पात्र या रस्त्याच्या लगत उपलब्ध होत असल्याने  रस्ता बांधकामासाठी लागणारे गौण खनिज या पात्रातूनच उपलब्ध करून घेण्याबाबत व त्या माध्यमातून पैनगंगा नदीचे खोलीकरण तसेच पुनर्जीवनाचा प्रस्ताव गेल्या नऊ महिन्यांपासून आ. सपकाळ यांनी शासन दरबारी लावून धरला होता.त्यास मूर्तरूप आले असून, राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३-ई च्या बांधकामासाठी लागणार्‍या एकूण दहा लाख २७ हजार क्युबीक मीटर गौण खनिजापैकी पहिल्या टप्प्यात तीन लाख ४0 हजार २00 क्युबीक मीटर गौण खनिज हे पैनगंगा नदीपात्रासोबतच मढ, चौथा, पाडळी येथील एकूण पाच गाव तलवातून उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. यापूर्वी पैनगंगा नदीच्या पुनर्जीवनासाठी चार कोटी ९७ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता. या निधीमधून कोलवडपासून मढपयर्ंत सिमेंट बांधसुद्धा उभारण्यात आले आहेत.

स्थळ निश्‍चितीकरण पूर्णया अनुषंगाने १२ जानेवारीला कोलवड, दत्तपूर, देऊळघाट, पळसखेड, चौथा, मढ, पाडळी या गावांसह पैनगंगेची सुमारे दहा किमी फेरी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी केली होती.  यावेळी त्यांच्या समवेत बुलडाणा उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, लघुपाटबंधारे विभागाचे अभियंता नागपूरे, पाटील, केंद्रीय महामार्ग प्राधिकरणाचे माजी कार्यकारी अभियंता व्ही. डी. पाटील,  कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सुनील तायडे,  रसुल खान, अमोल तायडे, भागवत वानेरे, संबंधित भागातील गावांचे सरपंच कौतिकराव पाटील, आरिफ खान, गजानन गायकवाड, भारत भिसे, संगीता जाधव, विजय कड, छाया मुळे, सविता जाधव, संगीता पवार उपस्थित होत्या. 

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळbuldhanaबुलडाणाhighwayमहामार्गPainganga Bridge Mehkarपैनगंगा पूल मेहकर