शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
2
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
3
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
4
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
5
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
6
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
7
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
8
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
9
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
10
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
11
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
12
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
13
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
14
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
15
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
16
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
17
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
18
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
19
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
20
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग विद्यार्थ्यांना ‘लेखानिक’ची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:48 IST

दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून, दहावीच्या परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत होणार ...

दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून, दहावीच्या परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत होणार आहेत. बारावीच्या परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेचे विद्यार्थी व पालकांमध्ये चिंता वाढलेली आहे. सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा दिव्यांग विद्यार्थ्यांची मोठी अडचण आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा सोडविण्यासाठी आवश्‍यक असणारा लेखनिक मिळणे अवघड झाले आहे. शहरातील दिव्यांग शाळांनी लेखनिक उपलब्ध व्हावा, म्हणून सामान्यांच्या शाळा व्यवस्थापनाकडे मागणी केली आहे. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही. दिव्यांगांच्या श्रेणीतील अंध, अस्थिव्यंग, मतिमंद या विद्यार्थ्यांना लेखनिकाची गरज भासते. दहावी आणि बारावीत अंध विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त असते.

या विद्यार्थ्यांना शिकविण्याबरोबरच परीक्षेची तयारी करून घेणे व त्यांना परीक्षेच्या काळात लेखनिक उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शाळांची असते. दिव्यांग शाळांच्या परिसरातील शाळा अथवा ओळखीच्या शाळांना पत्र पाठवून लेखनिकांची मागणी केली जाते आणि शाळा त्या विद्यार्थ्यांना लेखनिकही उपलब्ध करून देतात. परंतु यावर्षी कोरोनामुळे लेखनिकांची अडचण निर्माण झाली आहे. सामान्यांच्या शाळांनी लेखनिकासाठी दिव्यांग शाळांना प्रतिसादच दिलेला नाही.

पालक काय म्हणतात...

दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत सध्या मोठी अडचण निर्माण झालेली आहे. गणित विषय सोडल्यास इतर सर्व विषयांसाठी नवव्या वर्गाचा विद्यार्थी लेखनिक म्हणून मदत करू शकतो. परंतु गणित विषयासाठी त्यांना सहाव्या वर्गाचा लेखनिक पाहिजे.

सहाव्या वर्गाचा विद्यार्थी अतिशय लहान असल्याने त्याचे पालक त्याला परीक्षेला पाठवतील की नाही? हा प्रश्नच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांना पडला आहे. शाळाही बंद आहेत. अशात लेखनिक शोधणे अवघड होऊन बसले आहे.