शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

डायरियाचे थैमान; ८0 रुग्णांवर उपचार सुरू

By admin | Updated: June 21, 2014 00:01 IST

धाड येथील ग्रामीण रूग्णालयामध्ये डायरियाचे ८0 रुग्ण भरती; नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन

धाड : गेल्या तीन दिवसांपासून डायरियाने धाडवासीयांना हैराण केले असून, आजही येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची रीघ कायम होती. गत दोन दिवसात निर्माण झालेल्या परिस्थितीने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने गावात ठिकठिकाणी पाण्याचे नमुने घेण्यात आले. यात सर्व नमुने दूषित असल्याचे आढळून आले. त्यामुळे नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन करण्यात आले. आज दुपारपर्यंत येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये ८0 रुग्ण भरती होते तर बहुतांश प्रमाणात रुग्णांना औषधोपचार करण्यात आले होते. एकंदरीत आज रुग्णसंख्येत घट झाल्याचे आढळून आले. आरोग्य विभागामार्फत गावातील विविध भागातून गेल्या दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पाणी नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून, ते पाणी पिण्यास अयोग्य असल्याची माहिती मिळाली आहे. तर स्थानिक ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा करणार्‍या विहिरींचे पाणी नमुने घेऊन ते तपासणीस रवाना केल्याची माहिती आहे. या रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या रुग्णांपैकी १९ जून रोजी आरोग्य विभागाचे अधिकार्‍यांनी ६ रुग्णांचे स्टुल सॅम्पल (विष्ठा नमुने) घेऊन ते प्रयोगशाळेस तपासणीस पाठवले असता पैकी ३ रुग्णांचे नमुना तपासणी अंती तो ह्यकॉलराह्ण असल्याची माहिती याठिकाणी आरोग्य अधिकारी व कर्मचार्‍यांचे गुप्त चर्चेतून बाहेर आले; परंतु कोणीही याबाबत जाहीरपणे सांगण्यास नकार दिल्याने ही फक्त चर्चाच राहिली. तर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.साबीर खान यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, रुग्णांचे स्टुल सॅम्पल नमुने हे तपासणीस पाठवले असून, माझ्यापर्यंत त्याचा अहवाल प्राप्त झाला नाही. त्यामुळे तो कॉलरा आहे किंवा आणखी काय, हे निश्‍चितपणे सांगता येत नाही. याबाबत आरोग्य विभागाने त्या नमुन्यांचा अहवाल लवकर जाहीर करुन आरोग्य प्रशासनाच्यावतीने नागरिकांना योग्य आरोग्यसेवा देऊन या आजारावर नियंत्रण मिळवण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.