शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

ढोरपगाव परिसराला गारपीट, शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला

By विवेक चांदुरकर | Updated: April 9, 2024 17:12 IST

मका, ज्वारी, गहू पिकांचे नुकसान : सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस

ढोरपगाव : परिसरातील पिकांना ९ एप्रिल रोजी दुपारी गारपीटचा तडाखा बसला. यामुळे सोंगणीला आलेले मका, ज्वारी, कांदा आणि गहु या पिकांचे अतोनात नुकसान झाले. गारपीटमुळे शेतकर्यांच्या तोंडचा घास हिरावल्या गेला आहे. खामगाव तालुक्यातील ढोरपगाव, वडजी भेंडी, बेलखेड, कवडगाव, अंबरगड, चिचखेड, काळेगाव, दिवठाणा, वर्णा, रोहणा, निमकवळा या परिसरातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजतापासून अचानक गारपीट सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मका, ज्वारी, कांदा, गहु, केळी बागांचे नुकसान झाले. गहू, ज्वारी, मका सोंगणीला आले आहे. काही शेतकर्यांची सोंगणी आटोपली असून, बहूतांश शेतकर्यांची सोंगणी बाकी आहे. आठ दिवसात पीक घरामध्ये येणार होते. मात्र त्यापूर्वीच झालेल्या गारपीटीने शेतकर्यांच्या तोंडचा घास हिरावला. शेतकरी व फळ उत्पादक चिंतेत पडले आहे. त्यामुळे उत्पादनात घट येणार आहे. या आठवड्यात तीन ते चार दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे पिकांवर किडी, अळ्यांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. संकटांची मालिका शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. अवकाळीने पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने परिसरातील शेतकरी शेतकरी हैराण झाले आहेत.सर्वेक्षण करून भरपाइ देण्याची मागणीपिक घरात येण्याच्या अवस्थेत असताना अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. संबंधित प्रशासनाने पंचनामा करून तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांची मागणी होत आहे..फोटो आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीHailstormगारपीटCropपीक