शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

देऊळगाव माळीची महिला सायकलींग स्पर्धेत प्रथम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 01:05 IST

हिवरा आश्रम : वाशिम येथील वाशिम रॉटीनियर्स ग्रुपच्यावतीने आयोजित ३00 किलोमीटर सायकलींग स्पर्धेत मेहकर तालुक्यातील देऊळगावमाळी येथील अलका गजानन गिर्‍हे यांनी कमीत कमी वेळेत अंतर पार करून यश संपादन केले.

ठळक मुद्देवाशिम येथे पार पडली ब्रेवेट ३00 किलोमीटर स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम : वाशिम येथील वाशिम रॉटीनियर्स ग्रुपच्यावतीने आयोजित ३00 किलोमीटर सायकलींग स्पर्धेत मेहकर तालुक्यातील देऊळगावमाळी येथील अलका गजानन गिर्‍हे यांनी कमीत कमी वेळेत अंतर पार करून यश संपादन केले.मूळ फ्रांस या देशाची ब्रेवेट स्पर्धा असून, आता या ब्रेवेट स्पर्धेचे जाळे भारतभर पसरत आहे. भारतात ही स्पर्धा २0१0 पासून सुरू झाली आहे. वाशिम येथील रॉटीनियर्स ग्रुपने ही स्पर्धा आयोजित केली होती. सदर स्पर्धा ही ३00 किलोमीटर अंतर २0 गावांमध्ये पूर्ण करावयाचे होते. सदर ब्रेवेट स्पर्धा वाशिमरून मालेगाव, शेलू, अमरावती, नागपूर, बायगाव राहाटगाव येथे १५0 किमी व परत त्याच मागील बायगाव राहटगाव येथे १५0 किमी व परत त्याच मार्गाने वाशिम असे एकूण ३00 किमी अंतर  होते. या स्पर्धेकरिता एकूण बारा जणांनी सहभाग नोंदविला होता. पैकी नऊ पुरुष व तीन महिला सहभागी होत्या. महिलांमध्ये सदर ३00 किलोमीटरचे अंतर देऊळगाव माळीच्या अलका गजानन गिर्‍हे यांनी कमी वेळात पार करून यश संपादन केले. अलका गिर्‍र्हे यामध्ये महाराष्ट्रातून पहिली महिला सायकलपटू आहे जिने हा बहुमान मिळविला. अलका या वाशिमचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव इंगोले व माजी सभापती लताबाई इंगोले यांच्या कन्या असून, त्यांचा विवाह देऊळगाव माळी येथील जयरामजी गिर्‍र्हे यांचे सुपुत्र तथा विवेकानंद आश्रमचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन जयराम गिर्‍हे यांच्याशी झालेला आहे. अलका गिर्‍हे यांना लहानपासूनच सायकलींगची आवड होती. त्यामुळे त्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. तसेच या स्पर्धेत त्यांनी महिला गटात प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला. या यशाचे o्रेय त्या कमलताई गिर्‍हे, डॉ.विजयकुमार गिर्‍हे, डॉ.प्राची गिर्‍हे, नारायण व्यास यांना देतात. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाwashimवाशिमSportsक्रीडा