देऊळगाव राजा : तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींपैकी २२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण महिलांसाठी निघाले आहे. शुक्रवारी आरक्षण सोडत बुलडाणा येथे काढण्यात आली.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाती ११, अनुसूचित जमाती १, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी १३, सर्वसाधारण प्रवर्गासाठी २३ जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. बुधवारला तहसीलदार सारिका भगत यांनी आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण केली होती. शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणामध्ये महिलांसाठी राखीव झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये (सर्वसाधारण प्रवर्गासाठी अंभोरा, टाकरखेड भगिले, मेहुणा राजा, सिनगाव जहांगीर, देऊळगाव मही, गारखेड, धोत्रा नंदई, सुरा, टाकरखेड वायाळ, बायगाव बुद्रुक, पाडळी शिंदे या ग्रामपंचायती राखीव झाल्या आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी पिंपळगाव चिलमखा, उंबरखेड, दगडवाडी, चिंचखेड, बायगाव खुर्द, नागनगाव या ग्रामपंचायती राखीव झाल्या आहेत. अनुसूचित जातीसाठी बोराखेडी बावरा, शिवणी आरमाळ, आळंद, डिग्रस बुद्रुक, गारगुंडी, आदी राखीव झाले आहेत.