शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

देऊळगावराजा : एटीएम फोडताना चोरटे सीसी कॅमेर्‍यात कै द; रोकड नसल्याने चोरी फसली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:48 IST

देऊळगावराजा: येथील जुना जालना मार्गावर असलेले महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून कॅश लुटण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार ९ जानेवारी पहाटे उघडकीस आला. तब्बल १८ मिनिटे दोन चोरटे एटीएममध्ये असल्याचे सीसी कॅमेर्‍यात कैद झाले असून, रोकड नसल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला.

ठळक मुद्देजुना जालना मार्गावर महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून कॅश लुटण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगावराजा: येथील जुना जालना मार्गावर असलेले महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून कॅश लुटण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार ९ जानेवारी पहाटे उघडकीस आला. तब्बल १८ मिनिटे दोन चोरटे एटीएममध्ये असल्याचे सीसी कॅमेर्‍यात कैद झाले असून, रोकड नसल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला.स्थानिक बँक ऑफ महाराष्ट्रचे हे एटीएम आहे. रात्री १२ वाजून ५७ मिनिटाला एटीएममध्ये दोन युवकांनी प्रवेश केला. यातील निळय़ा रंगाच्या टोपी, जरकीन घातलेल्या युवकाने लोखंडी पहार सीसी कॅमेर्‍यावर चारदा मारली व बाहेर निघून गेला त्या नंतर दुसर्‍या युवकाने सदर पहार ए.टी.एम.मशीनीच्या वरच्या बाजूने मारुन मशीन फोडण्याचा प्रयत्न केला थोड्या वेळेनंतर मशीन समोरच्या दिशेने उघडली मात्र त्यात कॅश नसल्याने त्यांची झुंज अपयशी ठरली. सदर १८ मिनिटाचा थरार ए.टी.एम.च्या कॅबीनमध्ये लावलेल्या सी.सी.टि.व्ही.मध्ये कैद झाला. दरम्यान पहाटे साडेपाचच्या सुमारास ए.टी.एम.मधील अस्वच्छता स्वच्छ करण्यासाठी हातात झाडू घेवून आलेल्या व्यक्तीला ए.टी.एम.फोडलेल्या अवस्थेत दिसला, त्यावेळी सदर घटना उघडकीस आली. सकाळी महाराष्ट्र बँकेचे शाखा अधिकारी डि.आर.काळे यांनी ए.टी.एमची पाहणी करुन वरीष्ठ अधिकार्‍यांना सदर प्रकाराबाबत अवगत केले. तद्नंतर लेखी तक्रार देण्यासाठी पोलिसात गेल्यावर सि.सी.टी.व्ही.फुटेज घेवून यानंतर गुन्हा दाखल करु असे पोलिस सुत्रांकडून त्यांना सांगितले गेले. वृत्त लिहेपर्यंत सदर घटनेविषयी गुन्हा पोलिसात नोंदविण्यात आला नव्हता. दरम्यान कॅश संपल्याने एटीएम फोडल्यावरही चोरट्यांना एटीएममध्ये नोटा आढल्या नाही. 

टॅग्स :Maharashtra Bankमहाराष्ट्र बँकCrimeगुन्हाatmएटीएमbuldhanaबुलडाणा