शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

निधी असूनही अपंगांना सुविधा मिळेनात! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 1:18 PM

खामगाव : अपंग व्यक्तींना सक्षम बनवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन एकीकडे प्रयत्नशील असतांना बुलडाणा जिल्हयात मात्र अपंगांना सेवा सुविधांपासून वंचीत ठेवण्यात येत असल्याचे वास्तव आहे.

- योगेश फरपटखामगाव : अपंग व्यक्तींना सक्षम बनवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन एकीकडे प्रयत्नशील असतांना बुलडाणा जिल्हयात मात्र अपंगांना सेवा सुविधांपासून वंचीत ठेवण्यात येत असल्याचे वास्तव आहे. जिल्हयातील खामगाव ग्रामिणसह अनेक ग्रामपंचायतींना अपंगांसाठीचा निधी खर्च केला नसल्याने अपंगांना मिळणाºया सुविधा अद्याप प्राप्त होवू शकल्या नाहीत. समाजातील दृष्टीहीन, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मनोविकलांग व कुष्ठरोगमुक्त अपंग व्यक्तींकडे त्यांच्या अपंगत्वाकडे न पाहता त्यांच्यामध्ये असलेल्या सामर्थ्यांकडे पाहून त्यांच्या मधील असलेले सुप्त सामर्थ्य विकसित करुन त्यांना समाज जीवनाच्या सर्व अंगामध्ये समान संधी, संपूर्ण सहभाग व त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय, तसेच इतर विविध विभागांमार्फत कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत अपंगांना विविध योजनांचा लाभ दिल्या जातो. याशिवाय प्रत्येक ग्रामपंचायतीला ३ टक्के निधी हा अपंगावर खर्च करावा लागतो. चालू वर्षापासून ५ टक्के निधी खर्च केला जाणार आहे. या निधीचा विनियोग हा अपंगांना गरजेनुसार वस्तू किंवा रोख रकमेच्या स्वरूपात केला जातो. ग्रामपंचायत स्तरावरील समिती त्याचे नियोजन करते. प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींनी हा निधी अद्याप खर्च केला नाही. यामध्ये खामगाव ग्रामिण ग्रामपंचायतीसह विविध ग्रामपंचायतीचा समावेश आहे. 

 

 माझ्या आधीच्या ग्रामसेवकाने हा निधी खर्च केला नाही. मी काही महिन्यापूर्वीच पदभार घेतला आहे. निधी खर्चाचे नियोजन झाले आहे. ग्रामपंचायत समितीने ठरवल्यानुसार लवकरच एखादा कार्यक्रम घेवून निधीचे होणार आहे.  - गजानन सोळंके, ग्रामसेवक, खामगाव ग्रामिण 

 

ग्रामपंचायतींना हा निधी खर्च करावाच लागतो. सर्वच ग्रामपंचायतींना निधी खर्च केला आहे. खामगाव ग्रामिणचा विषय असेल तर याबाबत गटविकास अधिकारी सांगू शकतील. - संजय चोपडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत, जि.प.बुलडाणा 

 

सरकार सुरवातीपासून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरत आहे. अपंगाना सुद्धा त्यांनी सोडले नाही. अपंगांना सेवा सुविधा न पुरविल्यास पंचायत समितीसमोर डफडे बजाओ आंदोलन छेडण्यात येईल. - दिलीपकुमार सानंदा, माजी आमदार, खामगाव 

 

  अपंगांना सेवा सुविधा पुरवल्या गेल्याच पाहिजे. दिरंगाई करणाºया अधिकारी, कर्मचाºयांना धडा शिकवू. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाशी संपर्क करतो.  - बच्चू कडू , आमदार तथा संस्थापक, प्रहार संघटना

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव