शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गड, किल्ले भाडे तत्वावर देण्याच्या विरोधात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 14:48 IST

शासनाने घेतलेला हा तात्काळ मागे घेण्यात यावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: राज्यातील २५ गडकिल्ले लग्न समारंभासाठी भाडे तत्वावर देण्याच्या शासनाच्या निर्णया विरोधात शिवप्रेमींनी ९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे तीव्र निदर्शने केली. शासनाने घेतलेला हा तात्काळ मागे घेण्यात यावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.ज्या गडकोट किल्ल्यांसाठ १८ पगड जातीच्या मावळ्यांनी रक्त सांडून ही गडकोट उभी केली त्याच गडकोटांनी शेकडो वषार्नंतर उभ्या राहिलेल्या स्वराज्याचे रक्षण करण्याचे काम केले. गडकोट आणि किल्ले दैवत व तिर्थच आहे. तेथील प्रत्येक दगड ही इतिहासाची साक्ष देतात. परंतू महाराष्ट्र सरकारने ३ सप्टेंबर रोजी मंत्री मंडळात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकोट किल्ल्यांना हॉटेल, लग्न समारंभ इत्यादीकरीता भाडे तत्वांवर देण्याचा विकृत निर्णय पारीत करण्यात आला आहे. ऐतिहासीक वारसा लाभलेल्या कोणत्याही वास्तुंना खाजगी कंत्राटदारांना भाडे तत्वावर देवू नये, यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी सागर काळवाघे, प्रा. अमोल वानखेडे, माजी आ. विजयराज शिंदे, संजय गायकवाड, अ‍ॅड. जयश्रीताई शेळके, डॉ. गायत्री सावजी, डी. आर.माळी, रामदास काकडे, कुणाल पैठणकर, दत्ता काकस, गौरव गरड, विठ्ठल इंगळे, विशाल शेळके, महेश देवरे, शैलेश खेडेकर, मुन्ना बेंडवाल, दामोदर बिडवे, राणा चंदन, गणेश रेखे, अ‍ॅड. जयसिंगराजे देशमुख, बावस्कर, वसिम, कुणाल गायकवाड, प्रा. नीलेश सुरोशे, ओम पसरटे, दीपक तुपकर, अनिल रिंढे,अनिरुद्ध खानझोडे, आदेश कांडेलकर यांच्यासह शेकडो शिवप्रेमी उपस्थीत होते. 

शिवप्रेमींच्या मागण्यामहाराष्ट्रातील ऐतिहासीक वास्तुंचे संवंर्धन व जतन करण्याकरीता कायद्यात अधिक चांगली तरतूद करण्यात यावी, गडकोट, ऐतिहासीक वास्तू मग ते वर्ग १ असो वा वर्ग २ यावर काम करीत असताना महाराष्ट्रातील सर्व मान्यताप्राप्त सर्व शिवप्रेमी संघटना, इतिहास मंडळ, इतिहासकार यांना विचारात घेवून निर्णय घेण्यात यावा, तरतूदीनुसार खर्च व कामांचा आढावा जनतेसमोर मांडावा, मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्यात ऐतिहासीक वारसा असणाºया वास्तुंचे जतन व संवर्धनासाठी तरतूद करण्यात यावी, शासनाने घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करावा, आदी मागण्या शिवप्रेमींनी माडल्या.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagitationआंदोलन