शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जिगावसाठी ४,९०६ कोटींच्या विशेष निधीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 12:00 IST

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांच्याकडे ४,९०६ कोटी रुपयांच्या विशेष निधीची मागणी करणारा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्यपालांच्या निधी वाटपाच्या सुत्राच्या बाहेर जावून जिगाव प्रकल्प त्वरित मार्गी लागावा यासाठी सहा आॅगस्टच्या मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीतील निर्णयानुसार जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांच्याकडे ४,९०६ कोटी रुपयांच्या विशेष निधीची मागणी करणारा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.जिगाव प्रकल्पावर मार्च २०२० अखेर पर्यंत ४,०९९ कोटी रुपयांचा खर्च झाला असून त्यापैकी भूसंपादन व पुनर्वसनाच्या कामावर २००३ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. सोबतच पुर्नवसनाच्या उर्वरित कामासाठी ४,९०६ कोटी रुपयांची अवश्यकता आहे. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पास गती देण्यासोबतच भूसंपादन व पुनर्वसनाच्या कामासाठी पुढील तीन वर्षासाठी राज्यपालांच्या निधी वाटपाच्या सुत्राच्या पलिकडे जावून विशेष बाब म्हणून हा निधी उपलब्ध करण्याची मागणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली असल्याची माहिती मलकापूरचे काँग्रेसचे आ. राजेश एकडे यांनी दिली. सिंचन अनुशेष निर्मुलन कार्यक्रमातंर्गत हा निधी उपलब्ध करण्यासाठी सध्या जलसंपदा विभागातंर्गत प्रयत्न सुरू आहे. प्रामुख्याने प्रकल्पाचा पहिला टप्पा पुर्णत्वास जावा, यासाठी हा रेटा वाढविण्यात आला आहे. २०२३ पर्यंत हा पहिला टप्पा पुर्ण करून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना प्रकल्पाचा लाभ उपलब्ध करण्याची ही भूमिका यात आहे. त्यानुषंगानेच सहा आॅगस्ट रोजी मुंबई मंत्रालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत प्रामुख्याने असा प्रस्ताव देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुषंगाने २० आॅगस्ट रोजीच हा प्रस्ताव राज्यपालांकडे देण्यात आला आहे. प्रकल्पास विशेष बाब म्हणून हा निधी उपलब्ध झाला तर अमरावती विभागाचा सिंचन अनुशेष दुूर होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर तथा राजकीय वर्तुळात याकडे सकारात्मक दृष्टीने बघितल्या जात आहे.

यंदा २७९.७० कोटी खर्चचालू आर्थिक वर्षासाठी जिगाव प्रकल्पाच्या कामासाठी ६९० कोटी ८१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी २७९.७० कोटी रुपयांचा खर्च आतापर्यंत प्रकल्पाच्या कामावर करण्यात आला आहे. दरवर्षी विभागास उपलब्ध होणाºया निधीची तरतूद पाहता याच वेगाने निधी उपलब्ध झाल्यास प्रकल्पाची कामे व अनुशेष निर्मूलन कालमर्यादेत होणे अवघड होवून बसणार आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प