शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

उसनवारीच्या पैशांच्या मोबदल्यात विवाहितेला शरीरसुखाची मागणी;  विनयभंगाचा गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 14:55 IST

खामगाव: ‘पती’कडून उसनवारीचे पैसे देण्यास विलंब होत असल्याचा राग धरून  आरोपीने बर्डे प्लॉट भागातील एका २७ वर्षीय विवाहितेला   शरीरसुखाची मागणी करून विनयभंग केला.

ठळक मुद्देबर्डे प्लॉट भागातील एका २७ वर्षीय विवाहितेच्या पतीने आरोपीकडून पैसे उसने घेतले होते.उसनवारीच्या पैशांसाठी तगादा लावतानाच, विवाहितेच्या पतीला तसेच मुलाला जीवे मारण्याची धमकीही आरोपीकडून केली जात होती. याप्रकाराने लज्जीत  झालेल्या विवाहितेने १७ फेब्रुवारी रोजी उंदीर मारण्याचे विषारी औषध प्राशन केले.

खामगाव: ‘पती’कडून उसनवारीचे पैसे देण्यास विलंब होत असल्याचा राग धरून  आरोपीने बर्डे प्लॉट भागातील एका २७ वर्षीय विवाहितेला   शरीरसुखाची मागणी करून विनयभंग केला. ही घटना  १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला.बर्डे प्लॉट भागातील एका २७ वर्षीय विवाहितेच्या पतीने आरोपीकडून पैसे उसने घेतले होते. ही रक्कम परत देण्यास विलंब होत असल्याचा राग बाळगत गेल्या काही दिवसांपासून संबधीत आरोपीकडून विवाहितेस त्रास दिल्या जात होता. उसनवारीच्या पैशांसाठी तगादा लावतानाच, विवाहितेच्या पतीला तसेच मुलाला जीवे मारण्याची धमकीही आरोपीकडून केली जात होती. दरम्यान, आरोपीने १७ फेब्रुवारी रोजी विवाहिता घरात एकटी असताना, कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच उसनवारीच्या पैशांच्या मोबदल्यात वाईट उद्देशाने जवळ येऊन शरीरसुखाची मागणी केली. याप्रकाराने लज्जीत  झालेल्या विवाहितेने १७ फेब्रुवारी रोजी उंदीर मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. प्रकृती अत्यवस्थ असल्याने ही महिला खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात  भरती होती. २१ फेब्रुवारी रोजी रूग्णालयातून सुटी झाल्यानंतर विवाहितेने शिवाजी नगर पोलिस स्टेशन तक्रार दिली. या महिलेच्या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिसांनी वाजीद शमशाद पठाण याच्या विरोधात कलम ३५४-अ, ४५२, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला.

टॅग्स :khamgaonखामगावPolice Stationपोलीस ठाणेCrimeगुन्हा