शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस निरीक्षकाच्या नावे दारुची मागणी; महिला पोलिस कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 18:33 IST

पोलिस निरिक्षकांचे नाव सांगून दारूची मागणी करणे, एका पोलिस महिलेस चांगलेच महागात पडले.

खामगाव: येथील एका पोलिस निरिक्षकांचे नाव सांगून दारूची मागणी करणे, एका पोलिस महिलेस चांगलेच महागात पडले. चौकशीअंती जिल्हा पोलिस अधिक्षकांनी संबंधित महिलेला निलंबित केले. त्यामुळे पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे.खामगाव येथील नियंत्रणकक्षात कार्यरत असलेल्या महिला पोहेकॉ अनिता इर्शीद १० मे रोजी शेगाव रोडवरील एका हॉटेलात गेल्या. ग्रामीण पोलिस स्टेशनचे निरिक्षक रफीक शेख यांना पिण्यासाठी दारू हवी असल्याचे सांगत हॉटेलवरील पर्यवेक्षकाला दारूची मागणी केली. दारू न दिल्यास कारवाईची इशाराही दिला.  संबंधित हॉटेल मालकाने लागलीच पोलिस निरिक्षकांना घडलेला प्रकार सांगितला. पोलिस निरिक्षकांनी आपण दारू पित नसल्याने दारू मागण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगितले. त्यानंतर सदर हॉटेल मालक योगेश जाधव यांनी घडलेला प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. त्यानंतर संबंधित हॉटेल व्यावसायिकाने हा प्रकार वरिष्ठ पोलिस अधिकांºयांच्या कानावर घातला. अप्पर पोलिस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्याकडून हे प्रकरण  जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्याकडे पोहोचले. या प्रकरणाची चित्रफित पाठविण्यात आली. याप्रकरणी सखोल चौकशी अंती जिल्हा पोलिस अधिक्षकांनी अनिता इर्शीद यांना तात्काळ निलंबित केले. पोलिस निरिक्षकांसाठी दारू मागताना महिला पोलिस निलंबित झाल्याने पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे. दामिनी पथकातही चर्चेत!महिला पोहेकॉ अनिता इर्शीद दामिनी पथकात असताना चांगल्याच चर्चेत सापडल्या होत्या. काही जोडप्यांना विनाकारण त्रास दिल्याचा ठपका त्यांच्यावर त्यावेळी ठेवण्यात आला होता. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका सापळ्यातूनही त्या काही दिवसांपूर्वी थोडक्यात बचावल्या होत्या. आता पोलिस निरिक्षकांच्या नावे दारू मागितल्याच्या प्रकरणामुळे त्यांची उपरोक्त प्रकरणेही चर्चेत सापडल्याचे एका पोलिस कर्मचाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

टॅग्स :khamgaonखामगावPoliceपोलिसsuspensionनिलंबन