शहरं
Join us  
Trending Stories
1
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
2
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
3
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
4
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
5
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
6
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
7
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
8
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
9
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
10
विमानाचं उडणं, उतरणं... एका श्वासाचं अंतर!
11
५९ देश, ६१ भाषांतील ३१४ चित्रपटांची मेजवानी
12
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
13
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
14
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
15
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
16
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
17
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
18
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
19
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
20
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...

दुष्काळ जाहीर करण्याची शासनाकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:22 AM

खामगाव: घाटाखालील विविध तालुक्यात पिकांची परिस् िथती पावसाअभावी गंभीर बनलेली आहे. त्यामुळे आता  विविध तालुक्यांमधून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी  शासनाकडे करण्यात येत आहे.

ठळक मुद्देजळगाव जामोद, शेगावात तहसीलदारांना निवेदन विविध तालुक्यात पीक परिस्थिती गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: घाटाखालील विविध तालुक्यात पिकांची परिस् िथती पावसाअभावी गंभीर बनलेली आहे. त्यामुळे आता  विविध तालुक्यांमधून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी  शासनाकडे करण्यात येत आहे.

जळगाव जामोद: दुष्काळ जाहीर करण्याची शिवसेनेची  मागणीगत दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप  िपकांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. अनेक शेतकर्‍यांचा  लागवडीचा खर्च निघणे कठीण झाले आहे. काही शे तकर्‍यांना पिकांवर वखर फिरवल्याशिवाय गत्यंतर नाही.  त्यामुळे शेतकरी हा हवालदिल झाला आहे. या पृष्ठभूमीवर  जळगाव जामोद तालुका  दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात  यावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे शिवसेनेने केली  आहे. उपविभागीय महसूल अधिकारी धनंजय गोगटे यांना १४  ऑगस्टला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील, तालुका प्रमुख गजानन वाघ, शहर प्रमुख कैलाससिंह सोळंके,  विधानसभा संपर्कप्रमुख आबासाहेब पतंगे, उपजिल्हाप्रमुख  शांताराम दाणे, तालुका उपप्रमुख देवीदास घोपे, माजी  तालुकाप्रमुख संतोष दांडगे, माजी न.प. उपाध्यक्ष तुकाराम  काळपांडे, माजी उपसभापती विजय काळे, नगरसेवक  रमेश ताडे, खविसं उपाध्यक्ष संजय भुजबळ, वासुदेव  क्षीरसागर, शुभम पाटील, पवन पाटील, उपशहरप्रमुख  योगेंद्र पांधी, पुंडलिक पाटील, शिवाल पाटील व पवन  तेलंगडे यांनी निवेदन दिले. 

शेगावात भारिपचे  तहसीलदारांना निवेदन कमी पावसामुळे सध्या तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण  झाली आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शे तकर्‍यांची  दुबार-तिबार पेरणी वाया गेली. पिके वाळत  असून, ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाईसुद्धा निर्माण झाली  आहे. म्हणून शेगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा  आणि शेतकरी बांधवांना मदत देण्यात यावी, अशी मागणी  शहर व तालुका भारिप बहुजन महासंघाच्या वतीने  तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी पं.स. सभापती विठ्ठलराव पाटील, जि. प. सदस्य  तथा तालुकाध्यक्ष राजाभाऊ भोजने, पं. स. उपसभापती  सुखदेव सोनोने, युवा नेते नीळकंठ पाटील, तालुका सचिव  श्रीकृष्ण गवई, शहराध्यक्ष मिलिंद शेगोकार, दादाराव  शेगोकार, नगरसेवक राजेंद्र शेंगोकार यांच्यासह भारिप  बमसं पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते.

पातुर्डा परिसरातही दुष्काळ जाहीर करापिकांच्या ऐन उभारीच्या वेळेस पावसाचा ठणठणाट  असल्याने पातुर्डा परिसरावर दुष्काळाची छाया पसरली  आहे. त्यामुळे या भागातही दुष्काळ जाहीर करण्याची  मागणी होत आहे. पावसाळ्याचे अडीच महिने व श्रावण  महिना कोरडा गेला. आता या आठवड्यात पाऊस सक्रिय  न झाल्यास पातुर्डा परिसर दुष्काळाच्या गर्तेत ढकलला  जाईल इतकी विदारक स्थिती यावर्षी झाली आहे. शासनाने  यावर्षी कर्जमाफीची घोषणा केली. त्याचे भिजत घोंगडे  आहे. नव्याने कर्जपुरवठा झालाच नाही. पेरणीसाठी  शासनाने देऊ केलेले दहा हजार अद्यापही मिळाले नाहीत.  गेल्यावर्षीच्या खर्चाची तोंडमिळवणी करत उधारीवर बी- बियाणे खरेदी करून पेरण्या उकरल्या. अपुर्‍या पावसात  पेरण्या उलटल्या. दुबार पेरण्या कराव्या लागल्या. मोफत  बियाणे व बांधावर खत यासारख्या शासनाच्या योजना  फसव्या ठरल्या. तुरळक पावसावर पिके तग धरू लागली  होती; मात्र गेल्या तीन आठवड्यांपासून पाऊस गायब  झाला. अशातच वाढत्या उष्णतामुळे पिके करपली. उडीद,  मूग ही आंतर पिके गेल्यातच जमा आहेत. सोयाबीनच्या  फुलधारणेवर पाऊस नसल्याने तेही करपले. वाढत्या उष्ण तेमुळे व अपुर्‍या पावसामुळे जमिनीला चिरे पडले. पिकांची  मुळे तुटल्याने हिरवे पीक कोमेजू लागले आहे. पातुडर्य़ात  यावर्षी जूनमध्ये ६0 मिमी, जुलैमध्ये ८0 मिमी तर  ऑगस्टमध्ये अवघा १0 मिमी इतका पाऊस पडला. त्यामुळे  पातुर्डा परिसरातील शेतकरी संकटात सापडला असून,  शासनाने याची दखल घेऊन तत्काळ दुष्काळ घोषित  करावा व दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचा हात द्यावा,  अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.