शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पटसंख्या शून्य असतानाही शिक्षकांच्या समायोजनास विलंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 17:55 IST

इंदिरा गांधी नगर पालिका हायस्कूलमधील  विद्यार्थी संख्येसंदर्भात चुकीची, खोटी व दिशाभूल करणारी माहिती शासनास सादर केली.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  पटसंख्येच्या घोळामुळे चव्हाट्यावर आलेली म्युनिसिपल हायस्कूल अखेर बंद करण्यात आली आहे. सद्यस्थितीत एकही विद्यार्थी पटावर नसताना मुख्याध्यापकांसह ६ शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे या कर्मचाºयांच्या पगारापोटी शासनाच्या लक्षावधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे दिसून येते. शिक्षकांच्या समायोजनास शिक्षण विभागाकडून विलंब होत असल्याची चर्चा आहे.स्थानिक नगर पालिकेच्या इंदिरा गांधी नगर पालिका हायस्कूलमधील  विद्यार्थी संख्येसंदर्भात चुकीची, खोटी व दिशाभूल करणारी माहिती शासनास सादर केली. या माहितीच्या आधारे सन २०१७-१८ आणि २०१८-१९ या आर्थिक वर्षांत संच मान्यतेनुसार नियमबाह्य शिक्षकसंख्या मान्य करून घेतली. मात्र, प्रत्यक्षात प्रभारी मुख्याध्यापकांनी सादर केलेली माहिती आणि वस्तुस्थितीत प्रचंड तफावत आढळून आली. संगनमताने नियमबाह्य शिक्षकसंख्या मान्य करून शासनाची लाखो रूपयांची फसवणूक आणि नुकसान केले. दरम्यान, याप्रकरणी २३ जुलै २०१८ रोजी पहिल्यांदा जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालयासोबतच वरिष्ठ स्तरावर तक्रार करण्यात आली. या तक्रारीच्या अनुषंगाने कोणतीही कारवाई न झाल्याने, संबंधित तक्रारदारांनी  १३ फेब्रुवारी २०१९ रोजी शिक्षणाधिकारी आणि उपसंचालकांकडे यासंबधी तक्रार करण्यात आली. या तक्रारीच्या अनुषंगाने ३० मार्च रोजी उपशिक्षणाधिकारी एस.एस.काळुसे संबंधीत शाळेत धडकले होते. शाळेतील शून्य पटसंख्येचा  अहवाल नगर परिषद मुख्याधिकारी आणि शिक्षण विभाग बुलडाणा यांच्याकडे सादर केला आहे. सद्यस्थितीत शाळेत ६ शिक्षक कार्यरत आहेत. ३ शिक्षकेत्तर कर्मचाºयांना नगरपालिकेच्या सेवेत सामावण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी शिक्षणाधिकाºयांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. शिक्षणाधिकारी आदेश देतील तसे बदल शिक्षकांसंदर्भात केले जातील.-गजेंद्र जोगदंडप्रभारी मुख्याध्यापक, म्युनिसिपल हायस्कूल, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावSchoolशाळा