शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

केवळ काही क्षणांच्या फरकाने मृत्यूला मात; योगेश गवई अन् साईनाथ पवारचा वाचला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 08:16 IST

योगेश गवई व साईनाथ पवार या दोन्ही तरुणांचा सिंदखेडराजा जवळ झालेल्या बस अपघातात जीव वाचला.

-योगेश पांडे

नागपूर : कंपनीतील काम संपल्यावर घराकडे जाण्यास अक्षरश: धावत-पळत बस पकडली आणि निवांत डोळा लागला. मात्र, जोरदार धक्क्याने डोळे उघडले आणि समोर साक्षात मृत्यूच उभा असलेला दिसला. खिडकी तोडून बाहेर पडण्याची तत्परता दाखविली आणि केवळ काही क्षणांच्या फरकाने मृत्यूला मात देण्यात यशस्वी झाले. बस अपघाताच्या दाहकतेतून बचावल्यामुळे एकीकडे मनात समाधान असताना दुसरीकडे सोबतच्या प्रवाशांचा झालेला कोळसा अन् डोळ्यासमोर मृत्यूचे तांडव दाखविणारी ती काळरात्र मनातून कशी पुसणार हा सवाल त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

योगेश गवई व साईनाथ पवार या दोन्ही तरुणांचा सिंदखेडराजा जवळ झालेल्या बस अपघातात जीव वाचला. ‘लोकमत’ने साईनाथकडून ‘आंखो देखी’ जाणून घेतली. दोघेही छत्रपती संभाजीनगर येथे कामाला आहेत. ते कंपनीच्या कामासाठीच नागपुरात आले होते. शुक्रवारी सायंकाळी  बुटीबोरीतूनच ते बसमध्ये बसले. कारंजाजवळ जेवण आटोपल्यावर प्रवासी झोपले असताना सिंदखेडराजाजवळ बसमध्ये जोरदार धक्के लागले व उलथापालथ झाली. बसमधील एका पोलिस कर्मचाऱ्याने एक खिडकी तोडली. त्याचे अनुकरण करत आम्हीही खिडकी तोडून कसेबसे बाहेर आलो. एका प्रवाशाला बाहेर काढले. मात्र, मागील बाजूस आग लागली. त्यामुळे आम्ही समोरील बाजूला जाऊन चालकासमोरील मोठी काच तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठा स्फोट झाला, अशी माहिती साईनाथने दिली. 

चालक, वाहक कसे पडले बाहेर?अपघातग्रस्त बसचे चालक शेख दानिश शेख इस्माईल (वय २५, रा.दारव्हा, जि.यवतमाळ) याने बस पलटी होताच, आपल्या सुरक्षेचा मार्ग शोधला. त्याच्यासोबत बसचा वाहक संदीप मारोती राठोड (वय ३१, रा.तिवसा, जि.अमरावती) हे दोघेही चालकाच्या कॅबिनमधून कस बसे बाहेर पडले, मात्र या दोघांनीही मागील आपत्कालीन दरवाजा उघडण्यास मदत केली नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. चालकाने टायर फुटल्याने अपघात झाल्याचे म्हटले आहे, परंतु प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली असता, पोलिसांना हे निदर्शनास आले की, बसचा टायर फुटला नसून, चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. 

टॅग्स :Accidentअपघातbuldhanaबुलडाणा